S M L

कुत्र्यांवर प्रेम करणारा पक्ष म्हणजे मनसे,अजित पवारांचा घणाघात

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 10:58 PM IST

कुत्र्यांवर प्रेम करणारा पक्ष म्हणजे मनसे,अजित पवारांचा घणाघात

23 जानेवारी : कुत्र्यांवर प्रेम करणारा पक्ष म्हणजे मनसे,जिथे दोन-दोन वर्ष नेत्याचं दर्शन होत नाही असा पक्ष म्हणजे शिवसेना,आणि ज्यांच्या ओठात राम आणि पोटात नथुराम आहे ,असा पक्ष म्हणजे भाजप असल्याची शेलकी टीका करत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  विरोधकांवर चौफेर हल्ला चढ़वला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तान, पिंपरी चिंचवडमध्ये एका सभेमध्ये बोलताना त्यांनी मनसे आणि शिवसेना पक्षाची व्याख्याच करुन टाकली. उद्धव ठाकरे दोन दोन वर्ष आमदार खासदारांना भेटत नाही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. ज्यांच्या ओठात राम आणि पोटात नथुराम आहे तो पक्ष म्हणजे भाजप असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसंच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावरही टीका केली.  मराठवाङा विद्यापीठाच्या नामकरण वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला विरोध आपण विसरलो नाही पाहिजे आणि नव्या पिढीलाही सांगत राहिलं पाहिजे असं सांगत अजित पवारांनी टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 10:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close