S M L

बहुमत मिळूनही महापौरपदासाठी भाजपात रस्सीखेच

Samruddha Bhambure | Updated On: Mar 9, 2017 11:58 AM IST

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड

09 मार्च : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं असलं तरीही महापौर आणि उपमहापौर कोण होणार, हे अजूनही ठरलेलं नाही. निकाल लागून 2 आठवड्यांपैक्षा जास्त कालावधी उलटला आहे. पण लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या भाजपमधल्या दोन गटांमध्ये महापौरपदावरून स्पर्धा आहे. आता महापौरपदाच्या उमेदवाराची निवड थेट मुख्यमंत्र्यानाच करावी लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Pimpri mahapalika

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त करत पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपने एक हाती सत्ता आणली.  सत्ता उपभोगण्या आधीच पिंपरीत भाजपला गटबाजीच ग्रहण लागल आहे. सत्तेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे या शहरातील 2 आमदार आता एकेमकांवर कुरघोडोच राजकारण करू लागलयेत, त्यामुळेच अजून महापौराची निवड पक्की होत नाहीये.

किल्ले शिवनेरीवर शपथविधी सोहळ्याची ही दृश्य बघुन कुणालाही पिंपरीत भाजप मधील एकोप्याचा हेवा वाटेल, पण जरा थांबा. शपथ घेणारे हे एवढे सगळे नगरसेवक केवळ आमदार महेश लांडगे यांचेच समर्थक आहेत, आणि त्यामुळे शपथविधी ऐवजी हे शक्तिप्रदर्शन आहे, हे वेगळ सांगायला नको.

या आधीही काही महिन्यांपूर्वी लांडगे यांनी अश्याच प्रकारे शक्तिप्रदर्शन करत, व्हिजन 20-20 नावाचा एक पंचतारांकित कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक आणि 70 पेक्षा जास्त पदाधिकार्यांचं पक्षांतर करून घेतलं आणि आपली ताकद दाखवून दिली.

शक्तिप्रदर्शनचीही चढाओढ आणखी काही दिवस सुरू राहील. पण बाहेरुन आलेले महेश लांडगे पिंपरी-चिंचवडमधील भाजपवर आपली पकड मजबूत करणार, की  अंतर्गत वादात भाजप पोखरली जाणार ते बघाव लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close