S M L

मनसे कार्यकर्त्याने दमदाटी करून परीक्षेत बसवला डमी विद्यार्थी

20 मार्चपुणे : येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या मुलाच्या ऐवजी दमदाटी करुन एका डमी विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला बसवण्याची धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. एसपी कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. मनसेकडुन महापालिकेची निवडणूक लढवलेले राजेद्र मासुळे यांचा मुलगा हर्षद मासुळे हा बारावीला होता. त्याच्या ऐवजी एक डमी विद्यार्थी ही परीक्षा देत होता. त्याच्या घाबरलेल्या हावभावांवरुन पर्यवेक्षकांना शंका आली. त्यानंतर या विद्यार्थ्याकडे चौकशी केल्यानंतर कागदपत्र तपासल्यानंतर हा मुलगा म्हणजे हर्षद मासुळे नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र हा प्रकार उघडकीला आल्यानंतर राजेंद्र मासुळे यांनी आपल्याला दमदाटी केल्याची तक्रार पर्यवेक्षकांनी केली. या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून डमी विद्यार्थी तसंच हर्षद मासुळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2013 03:29 PM IST

मनसे कार्यकर्त्याने दमदाटी करून परीक्षेत बसवला डमी विद्यार्थी

20 मार्च

पुणे : येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या मुलाच्या ऐवजी दमदाटी करुन एका डमी विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला बसवण्याची धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. एसपी कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. मनसेकडुन महापालिकेची निवडणूक लढवलेले राजेद्र मासुळे यांचा मुलगा हर्षद मासुळे हा बारावीला होता. त्याच्या ऐवजी एक डमी विद्यार्थी ही परीक्षा देत होता. त्याच्या घाबरलेल्या हावभावांवरुन पर्यवेक्षकांना शंका आली. त्यानंतर या विद्यार्थ्याकडे चौकशी केल्यानंतर कागदपत्र तपासल्यानंतर हा मुलगा म्हणजे हर्षद मासुळे नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र हा प्रकार उघडकीला आल्यानंतर राजेंद्र मासुळे यांनी आपल्याला दमदाटी केल्याची तक्रार पर्यवेक्षकांनी केली. या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून डमी विद्यार्थी तसंच हर्षद मासुळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2013 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close