S M L

आदेशाला हरताळ, शेतीसाठी वळवलं पिण्याचं पाणी

30 मार्चपुणे : येथील खडकवासला प्रकल्पातून 27 मार्च पासून शेतीकरता पाणी सोडायला सुरूवात झालीय. 1 हजार 350 क्युसेक इतक्या वेगानं पुढचे 35 दिवस हे पाणी सोडलं जाणार आहे. दौंड, हवेली, इंदापूर या तालुक्यांतल्या उसाच्या पिकाकरता दरवर्षी प्रमाणं हे पाणी सोडलं जातंय. पण गेल्या 50 वर्षांनंतर राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे फक्त पिण्यासाठी पाणी द्यायचं ही प्राथमिकता ठरवलेली असतानाही पिकासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येतंय. 15 जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरेल असं नियोजन करण्यात आलंय असा दावा जरी प्रकल्प अधिकारी करत असले तरी वेळेत पाऊस झाला नाही तर मग काय ? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडं नाही. शिवाय पिण्यासाठीची प्राथमिकता डावलून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात असा प्रकार घडणं योग्य आहे का असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते आक्षेप घेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2013 10:56 AM IST

आदेशाला हरताळ, शेतीसाठी वळवलं पिण्याचं पाणी

30 मार्च

पुणे : येथील खडकवासला प्रकल्पातून 27 मार्च पासून शेतीकरता पाणी सोडायला सुरूवात झालीय. 1 हजार 350 क्युसेक इतक्या वेगानं पुढचे 35 दिवस हे पाणी सोडलं जाणार आहे. दौंड, हवेली, इंदापूर या तालुक्यांतल्या उसाच्या पिकाकरता दरवर्षी प्रमाणं हे पाणी सोडलं जातंय. पण गेल्या 50 वर्षांनंतर राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे फक्त पिण्यासाठी पाणी द्यायचं ही प्राथमिकता ठरवलेली असतानाही पिकासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येतंय. 15 जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरेल असं नियोजन करण्यात आलंय असा दावा जरी प्रकल्प अधिकारी करत असले तरी वेळेत पाऊस झाला नाही तर मग काय ? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडं नाही. शिवाय पिण्यासाठीची प्राथमिकता डावलून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात असा प्रकार घडणं योग्य आहे का असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते आक्षेप घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2013 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close