S M L

राज्यात 5 शहरात एलबीटी लागू, व्यापार्‍यांचा बंद

01 एप्रिलआजपासून राज्यातल्या पाच महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये जकात बंद होऊन स्थानिक संस्था कर म्हणजे एलबीटी लागू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये हा कर लागू होणार आहे. एलबीटीविरोधात या पाचही शहरांतल्या व्यापार्‍यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. तर पिंपरीतल्या व्यापार्‍यांनीही आज बंदची हाक दिलीय. एलबीटी कायद्यातल्या अटी जाचक आहेत, असा व्यापारांचा आरोप आहे. व्यापार्‍यांसोबत पुण्यातले पेट्रोल पंप चालकही या बंदमध्ये सहभागी होत आहेत. कोल्हापूरमधले व्यापारीही आजच्या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. तर नाशिक, मालेगाव, चंद्रपूर, अमरावती या चार महापालिकांमध्ये कोर्टाने मुदतवाढ 1 जूनपासून एलबीटी लागू होणार आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर मोहिनी लांडे यांनीच एल.बी.टी.ला विरोध केला. या करामुळे महागाई वाढेल असं म्हणत त्यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे.एलबीटी म्हणजे काय ? - एलबीटी म्हणजे स्थानिक संस्था कर - जकातीऐवजी लागू होणार- टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या महापालिका हद्दींमध्ये लागू होणार- लागू झाले आहे तेथे उत्पन्न वाढल्याचा शासनाचा दावा- महापालिकांचं उत्पन्न वाढेल- व्हॅट असताना नवीन कर का? व्यापारी संघटनांचा आरोप एलबीटी का?सरकारचा दावा- राज्य जकातमुक्त होईल- जकात चोरीला आळा बसेल- जकातीवरच्या यंत्रणेवर होणारा खर्च टळेल- सर्व व्यापारी वर्गाची नोंदणी होईल विरोध का?- इन्स्पेक्शन राज वाढेल- लहान व्यापार्‍यांचा जाच वाढेल- महापालिका कर्मचार्‍यांचा विरोध

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 09:32 AM IST

राज्यात 5 शहरात एलबीटी लागू, व्यापार्‍यांचा बंद

01 एप्रिल

आजपासून राज्यातल्या पाच महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये जकात बंद होऊन स्थानिक संस्था कर म्हणजे एलबीटी लागू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये हा कर लागू होणार आहे. एलबीटीविरोधात या पाचही शहरांतल्या व्यापार्‍यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. तर पिंपरीतल्या व्यापार्‍यांनीही आज बंदची हाक दिलीय. एलबीटी कायद्यातल्या अटी जाचक आहेत, असा व्यापारांचा आरोप आहे. व्यापार्‍यांसोबत पुण्यातले पेट्रोल पंप चालकही या बंदमध्ये सहभागी होत आहेत. कोल्हापूरमधले व्यापारीही आजच्या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. तर नाशिक, मालेगाव, चंद्रपूर, अमरावती या चार महापालिकांमध्ये कोर्टाने मुदतवाढ 1 जूनपासून एलबीटी लागू होणार आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर मोहिनी लांडे यांनीच एल.बी.टी.ला विरोध केला. या करामुळे महागाई वाढेल असं म्हणत त्यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे.

एलबीटी म्हणजे काय ?

- एलबीटी म्हणजे स्थानिक संस्था कर - जकातीऐवजी लागू होणार- टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या महापालिका हद्दींमध्ये लागू होणार- लागू झाले आहे तेथे उत्पन्न वाढल्याचा शासनाचा दावा- महापालिकांचं उत्पन्न वाढेल- व्हॅट असताना नवीन कर का? व्यापारी संघटनांचा आरोप

एलबीटी का?सरकारचा दावा- राज्य जकातमुक्त होईल- जकात चोरीला आळा बसेल- जकातीवरच्या यंत्रणेवर होणारा खर्च टळेल- सर्व व्यापारी वर्गाची नोंदणी होईल विरोध का?- इन्स्पेक्शन राज वाढेल- लहान व्यापार्‍यांचा जाच वाढेल- महापालिका कर्मचार्‍यांचा विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close