S M L

पुण्यात भाजप शहराध्यक्ष शेळकेंवर प्राणघातक हल्ला

04 एप्रिलपुणे : तळेगाव दाभाडे इथं भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर आज सकाळी सशस्त्र हल्ला करण्यात आला. एमआयडीसीतील कंपनीची कंत्राटे मिळवण्यावरून झालेल्या वादातून प्रतिस्पर्धी गटाकडून हा हल्ला झाला. या हल्ल्यात सचिन सचिन शेळके तसंच त्यांचे वडील आणि दोन भाऊ जखमी झाले. या घटनेनंतर स्वत: शेळके यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जायला नकार दिला. आणि सर्व समर्थकांसह तळेगाव स्टेशन चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी विनंती केल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर तळेगाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून तळेगाव स्टेशन भागात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. संध्याकाळपर्यंत या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. सचिन शेळके हे तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्षही आहेत. त्यांचा गेल्या काही दिवसांपासून त्यांचे कोटेश्वरवाडी येथील संतोष दाभाडे यांच्याशी एमआयडीसीतल्या कंपन्यांच्या कंत्राटावरून वाद सुरू होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2013 02:53 PM IST

पुण्यात भाजप शहराध्यक्ष शेळकेंवर प्राणघातक हल्ला

04 एप्रिल

पुणे : तळेगाव दाभाडे इथं भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर आज सकाळी सशस्त्र हल्ला करण्यात आला. एमआयडीसीतील कंपनीची कंत्राटे मिळवण्यावरून झालेल्या वादातून प्रतिस्पर्धी गटाकडून हा हल्ला झाला. या हल्ल्यात सचिन सचिन शेळके तसंच त्यांचे वडील आणि दोन भाऊ जखमी झाले. या घटनेनंतर स्वत: शेळके यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जायला नकार दिला. आणि सर्व समर्थकांसह तळेगाव स्टेशन चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी विनंती केल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर तळेगाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून तळेगाव स्टेशन भागात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. संध्याकाळपर्यंत या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. सचिन शेळके हे तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्षही आहेत. त्यांचा गेल्या काही दिवसांपासून त्यांचे कोटेश्वरवाडी येथील संतोष दाभाडे यांच्याशी एमआयडीसीतल्या कंपन्यांच्या कंत्राटावरून वाद सुरू होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close