S M L

माथेफिरू संतोष मानेला फाशी

08 एप्रिलपुण्यात वर्षभरापूर्वी बेदरकारपणे एस टी बस चालवून 9 निष्पापांचा बळी घेतलेल्या माथेफिरू एसटी ड्रायव्हर संतोष माने याला पुणे सेशन्स कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वध, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणे या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलं होतं. स्वारगेट एसटी स्थानकातून बस पळवून नेऊन संतोष मानेनं पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे चालवली होती. यामध्ये 9 जणांचा बळी गेला होता तर 27 जण जखमी झाले होते. संतोष माने याची मानसिक स्थिती ठीक असल्याचं सरकारी वकिलांनी सिद्ध केलं. हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा असल्याचं सांगत संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयामुळे अशी सरकारी वकील आणि पीडितांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच या निकालाबद्दल अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी समाधान व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:55 PM IST

माथेफिरू संतोष मानेला फाशी

08 एप्रिल

पुण्यात वर्षभरापूर्वी बेदरकारपणे एस टी बस चालवून 9 निष्पापांचा बळी घेतलेल्या माथेफिरू एसटी ड्रायव्हर संतोष माने याला पुणे सेशन्स कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वध, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणे या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलं होतं. स्वारगेट एसटी स्थानकातून बस पळवून नेऊन संतोष मानेनं पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे चालवली होती. यामध्ये 9 जणांचा बळी गेला होता तर 27 जण जखमी झाले होते. संतोष माने याची मानसिक स्थिती ठीक असल्याचं सरकारी वकिलांनी सिद्ध केलं. हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा असल्याचं सांगत संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयामुळे अशी सरकारी वकील आणि पीडितांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच या निकालाबद्दल अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी समाधान व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2013 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close