S M L

पुणे विकास आराखड्याचं प्रतिकात्मक विसर्जन

12 एप्रिलपुणे : विकास आराखडा हा बिल्डर धार्जीणा असल्याचा आरोप करत आज 'विकास आराखड्या'चं प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आलं. आराखड्याची विसर्जन मिरवणूक काढुन त्याचं मुळा-मुठा नदीत विसर्जन करण्यात आलं. पुणे जनहित आघाडीतर्फे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुणे जनहित आघाडीचे उज्ज्वल केसकर काँग्रेसचे रोहीत टिळक,संजय बालगुडे,तसंच भाजपचे नेते योगेश गोगावले असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. पुण्यातल्या मंडईतल्या टिऴक पुतळ्यापासून ते टिळक पुलापर्यंत या आराखड्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर या आराखड्याचं विसर्जन करण्यात आलं. या आरखाड्यामध्ये हिल टॉप हिल स्लोप चं निवासीकरण करण्यात आलं आहे. अनेक जागांवरची आरक्षण बदलून त्या ठिकाणी निवासीकरण करण्यात आलंय. शहराच्या पेठांमध्ये अडीच एफएसआय देण्याची आवश्यक्ता आहे. मात्र असं असलं तरी या ठिकाणी दीड एफएसआय प्रस्तावित कऱण्यात आला आहे. यामुळे जुन्या वाड्यांच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतील असा आरोप या नेत्यांनी केला आहे. याविरोधात आज पुणे जनहीत आघाडीने या मोर्चांचं आयोजन केलं होतं. नेत्यांनी या आराखड्याच्या माध्यमातून पुणे विकायला काढलं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या आराखड्या विरोधात सह्यांची मोहीम देखील राबवण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:14 PM IST

पुणे विकास आराखड्याचं प्रतिकात्मक विसर्जन

12 एप्रिल

पुणे : विकास आराखडा हा बिल्डर धार्जीणा असल्याचा आरोप करत आज 'विकास आराखड्या'चं प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आलं. आराखड्याची विसर्जन मिरवणूक काढुन त्याचं मुळा-मुठा नदीत विसर्जन करण्यात आलं. पुणे जनहित आघाडीतर्फे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुणे जनहित आघाडीचे उज्ज्वल केसकर काँग्रेसचे रोहीत टिळक,संजय बालगुडे,तसंच भाजपचे नेते योगेश गोगावले असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

पुण्यातल्या मंडईतल्या टिऴक पुतळ्यापासून ते टिळक पुलापर्यंत या आराखड्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर या आराखड्याचं विसर्जन करण्यात आलं. या आरखाड्यामध्ये हिल टॉप हिल स्लोप चं निवासीकरण करण्यात आलं आहे. अनेक जागांवरची आरक्षण बदलून त्या ठिकाणी निवासीकरण करण्यात आलंय. शहराच्या पेठांमध्ये अडीच एफएसआय देण्याची आवश्यक्ता आहे. मात्र असं असलं तरी या ठिकाणी दीड एफएसआय प्रस्तावित कऱण्यात आला आहे. यामुळे जुन्या वाड्यांच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतील असा आरोप या नेत्यांनी केला आहे. याविरोधात आज पुणे जनहीत आघाडीने या मोर्चांचं आयोजन केलं होतं. नेत्यांनी या आराखड्याच्या माध्यमातून पुणे विकायला काढलं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या आराखड्या विरोधात सह्यांची मोहीम देखील राबवण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2013 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close