S M L

LBT विरोधात 22 एप्रिलपासून बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक

12 एप्रिलस्थानिक कर (LBT) चा विरोध आता फक्त पुण्यापुरता न राहता संपूर्ण राज्यभर पसरतोय. येत्या 22 एप्रिलपासून एलबीटीविरोधात बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. 15 एप्रिलपासून मालाची खरेदीही बंद केली जाणार आहे. पुण्यात राज्यव्यापी व्यापारी परिषदेचं आयोजन करण्यात आली होती. गुरूवारीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 70 ते 80 टक्के छोट्या व्यापार्‍यांना एलबीटीच्या जाळ्यात ओढणार नाही असं सांगत व्यापार्‍यांनी बंद करून जनतेला वेठीस धरू नये असं व्यापार्‍यांना बजावलं होतं. पण मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत असा प्रतिआरोप करत व्यापार्‍यांनी सरकारचं व्यापारी आणि जनतेला वेठीला धरतंय असं सांगत बंदची घोषणा केलीय. 1 एप्रिल पासून राज्यातील 5 शहरात एलबीटी कर लागू करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ पुण्यातील व्यापार्‍यांनी सहा दिवस बंद पाळला होता. मात्र गुडीपाडव्याच्या सन दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे व्यापार्‍यांनी आपला बंद तुर्तास मागे घेतला होता. आता मात्र पुन्हा एकदा व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधात बंदचे हत्यार उपसले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:10 PM IST

LBT विरोधात 22 एप्रिलपासून बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक

12 एप्रिल

स्थानिक कर (LBT) चा विरोध आता फक्त पुण्यापुरता न राहता संपूर्ण राज्यभर पसरतोय. येत्या 22 एप्रिलपासून एलबीटीविरोधात बेमुदत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. 15 एप्रिलपासून मालाची खरेदीही बंद केली जाणार आहे. पुण्यात राज्यव्यापी व्यापारी परिषदेचं आयोजन करण्यात आली होती. गुरूवारीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 70 ते 80 टक्के छोट्या व्यापार्‍यांना एलबीटीच्या जाळ्यात ओढणार नाही असं सांगत व्यापार्‍यांनी बंद करून जनतेला वेठीस धरू नये असं व्यापार्‍यांना बजावलं होतं. पण मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत असा प्रतिआरोप करत व्यापार्‍यांनी सरकारचं व्यापारी आणि जनतेला वेठीला धरतंय असं सांगत बंदची घोषणा केलीय. 1 एप्रिल पासून राज्यातील 5 शहरात एलबीटी कर लागू करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ पुण्यातील व्यापार्‍यांनी सहा दिवस बंद पाळला होता. मात्र गुडीपाडव्याच्या सन दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे व्यापार्‍यांनी आपला बंद तुर्तास मागे घेतला होता. आता मात्र पुन्हा एकदा व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधात बंदचे हत्यार उपसले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2013 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close