S M L

गुंडाने बांधला शाळेत गोठा !

16 एप्रिलपुणे : इथं महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्थानिक गुंडांकडून त्रास सहन करावा लागत असल्याचं उघड झालंय. शहरातील शिवाजी रोडवर श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व तंत्र माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या पार्किंग परिसरात एका तडीपार गुंडानं चक्क गाई-बकरीचा गोठा बांधलाय. आणि विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे हा गोठा या पार्किंग परिसरात आहे. यामुळे शाळेची वाहनं इथं पार्क तर करता येत नाहीत, पण गोठ्यामुळे विद्यार्थ्यांना ही दुर्गंधी सहन करावी लागतेय. नंदू नाईक या गुंडानं हा गोठा बांधला असून तडीपार असूनही तो पुण्यात राहतोय. आरटीआय कार्यकर्ते रविंद्र बर्‍हाटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर खडबडून जागए झालेल्या पोलिसांनी नंदू नाईक या गुंडाला अटक केली आहे. एकूणच या प्रकारामुळे पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या शाळेतील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावं तसेच हा अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करणार्‍या महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रविंद्र बर्‍हाटे यांनी केली आहे

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:33 PM IST

गुंडाने बांधला शाळेत गोठा !

16 एप्रिल

पुणे : इथं महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्थानिक गुंडांकडून त्रास सहन करावा लागत असल्याचं उघड झालंय. शहरातील शिवाजी रोडवर श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व तंत्र माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या पार्किंग परिसरात एका तडीपार गुंडानं चक्क गाई-बकरीचा गोठा बांधलाय. आणि विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे हा गोठा या पार्किंग परिसरात आहे. यामुळे शाळेची वाहनं इथं पार्क तर करता येत नाहीत, पण गोठ्यामुळे विद्यार्थ्यांना ही दुर्गंधी सहन करावी लागतेय. नंदू नाईक या गुंडानं हा गोठा बांधला असून तडीपार असूनही तो पुण्यात राहतोय. आरटीआय कार्यकर्ते रविंद्र बर्‍हाटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर खडबडून जागए झालेल्या पोलिसांनी नंदू नाईक या गुंडाला अटक केली आहे. एकूणच या प्रकारामुळे पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या शाळेतील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावं तसेच हा अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करणार्‍या महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रविंद्र बर्‍हाटे यांनी केली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2013 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close