S M L

राष्ट्रवादीच्या नेत्याने पळवलं गावकर्‍यांचं पाणी !

16 एप्रिलराज्यात भीषण दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता होरपाळून निघाली आहे. दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्यासाठी सरकार, समाजसेवी संस्था प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानंच पाण्यावर डल्ला मारल्याची घटना पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात घडली आहे. पाणी पळवणार्‍या या नेत्याचं नाव दशरथ माने आहे. स्वत:च्या उद्योगासाठी मानेंनी पाण्यावर डल्ला मारल्याचं उघड झालंय. खडकवासला धरणातल्या पाण्याचा स्वत:च्या उद्योगासाठी मानेंनी वापर केलाय. दशरथ माने हे अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचंही समजतंय. या अगोदरही दुष्काळ परिस्थितीत असताना भास्कर जाधव यांनी आपल्या मुला मुलींच्या लग्नात पैशांची उधळपट्टी केली होती. यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भास्कर जाधव यांना चांगलेच फटकारले होते. विशेष म्हणजे अजित पवारांनी दुष्कारग्रस्तांची अर्वाच्य भाषेत खिल्ली उडवली म्हणून त्यांनी दोनवेळा माफीनामा सादर केला आणि रविवारी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाजवळ एक दिवसांचं उपोषण करत आत्मक्लेश केलं. आता अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माने गावकर्‍यांच्या पाण्याचा वापर उद्योगासाठी करत असल्यांचं उघड झालंय. त्यामुळे अजित पवार काय कारवाई करता हे पाहण्याचं ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:32 PM IST

राष्ट्रवादीच्या नेत्याने पळवलं गावकर्‍यांचं पाणी !

16 एप्रिल

राज्यात भीषण दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता होरपाळून निघाली आहे. दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्यासाठी सरकार, समाजसेवी संस्था प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानंच पाण्यावर डल्ला मारल्याची घटना पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात घडली आहे. पाणी पळवणार्‍या या नेत्याचं नाव दशरथ माने आहे. स्वत:च्या उद्योगासाठी मानेंनी पाण्यावर डल्ला मारल्याचं उघड झालंय. खडकवासला धरणातल्या पाण्याचा स्वत:च्या उद्योगासाठी मानेंनी वापर केलाय. दशरथ माने हे अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचंही समजतंय.

या अगोदरही दुष्काळ परिस्थितीत असताना भास्कर जाधव यांनी आपल्या मुला मुलींच्या लग्नात पैशांची उधळपट्टी केली होती. यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भास्कर जाधव यांना चांगलेच फटकारले होते. विशेष म्हणजे अजित पवारांनी दुष्कारग्रस्तांची अर्वाच्य भाषेत खिल्ली उडवली म्हणून त्यांनी दोनवेळा माफीनामा सादर केला आणि रविवारी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाजवळ एक दिवसांचं उपोषण करत आत्मक्लेश केलं. आता अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माने गावकर्‍यांच्या पाण्याचा वापर उद्योगासाठी करत असल्यांचं उघड झालंय. त्यामुळे अजित पवार काय कारवाई करता हे पाहण्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2013 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close