S M L

बनावट पत्र प्रकरणी प्रा.मिलिंद जोशी यांचा राजीनामा

24 एप्रिलपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळ या संस्थांच्या पदांचा राजीनामा देण्याची नामुष्की प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्यांवर ओढवली. जोशी यांनी मसापचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची बनावट सही आणि आशयाचं पत्र सादर करून साहित्य महामंडळाची फसवणूक केली होती. पुढच्या तीन वर्षांसाठी पुणे विभागाकडे साहित्य महामंडळाची जबाबदारी आहे. त्यावर अध्यक्ष म्हणून वर्णी लागावी यासाठी मिलिंद जोशी यांनी हा गुन्हा केला. त्यांचं वय आणि करिअर पाहून त्यांचा केवळ राजीनमा घेऊन त्यांना अभय दिल्याचं शेजवलकर यांनी सांगितलं. या प्रकरणामुळं साहित्य संस्थांमधलं राजकारण आणि गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2013 07:59 AM IST

बनावट पत्र प्रकरणी प्रा.मिलिंद जोशी यांचा राजीनामा

24 एप्रिल

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळ या संस्थांच्या पदांचा राजीनामा देण्याची नामुष्की प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्यांवर ओढवली. जोशी यांनी मसापचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची बनावट सही आणि आशयाचं पत्र सादर करून साहित्य महामंडळाची फसवणूक केली होती. पुढच्या तीन वर्षांसाठी पुणे विभागाकडे साहित्य महामंडळाची जबाबदारी आहे. त्यावर अध्यक्ष म्हणून वर्णी लागावी यासाठी मिलिंद जोशी यांनी हा गुन्हा केला. त्यांचं वय आणि करिअर पाहून त्यांचा केवळ राजीनमा घेऊन त्यांना अभय दिल्याचं शेजवलकर यांनी सांगितलं. या प्रकरणामुळं साहित्य संस्थांमधलं राजकारण आणि गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2013 07:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close