S M L

पुण्यात विकास आराखड्यावरून वाद सुरूच

27 एप्रिलपुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये तब्बल 20 लाख चौरस फूट जागा निवासी करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. सुराज्य संघर्ष समितीचे निमंत्रक विजय कुंभार यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केली. मोकळ्या जागा, उद्यानं, टेकड्या, रुग्णालय, अशी आरक्षणं असलेल्या जागा सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी उपसूचना सादर करुन आणि आरक्षण बदलवून निवासी केल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला. पुण्याचा विकास आराखडा हा बिल्डरांचा आराखडा असल्याची तक्रार सर्वच थरातून झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेत या आराखड्यावरती हरकती घेण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:30 PM IST

पुण्यात विकास आराखड्यावरून वाद सुरूच

27 एप्रिल

पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये तब्बल 20 लाख चौरस फूट जागा निवासी करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. सुराज्य संघर्ष समितीचे निमंत्रक विजय कुंभार यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केली. मोकळ्या जागा, उद्यानं, टेकड्या, रुग्णालय, अशी आरक्षणं असलेल्या जागा सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी उपसूचना सादर करुन आणि आरक्षण बदलवून निवासी केल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला. पुण्याचा विकास आराखडा हा बिल्डरांचा आराखडा असल्याची तक्रार सर्वच थरातून झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेत या आराखड्यावरती हरकती घेण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2013 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close