S M L

पुण्याच्या विकास आराखड्यात वाहतुकीची 'कोंडी' ?

03 मेपुणे : दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि त्याबरोबरच बोर्‍या वाजलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. पण पुढच्या अनेक वर्षांचा विचार करुन तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये मात्र याचा विचार करण्यात आलेला नाही अशी टीका पेटिस्ट्रिशियन फर्स्ट या संस्थेच्या प्रशांत इनामदार यांनी केली आहे. पुण्यामध्ये मेट्रो धावणार आहे. या मेट्रोच्या मार्गाच्या कडेने चार टक्के एफएसआय देण्याचा निर्णय झालेला आहे. पण या रस्त्याच्या रुंदीकरणाचा, वाहनांच्या संख्येचा,पार्किंगचा विचारच या विकास आराखड्यामध्ये करण्यात आलेला नाही. त्याबरोबरच पुण्यावरचा वाहतुकीचा भार कमी व्हावा यासाठी रिंग रोड प्रस्तावीत करण्यात आला. मात्र कोथरुड मधल्या भागामध्येच वेगळं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे सलग बांधण्याचा प्रस्ताव असलेला हा रस्ता पूर्ण होणार कसा असा प्रश्न निर्माण झालाय. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याऐवजी त्याचा बोजवारा उडवणारा हा विकास आराखडा असणार आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:03 PM IST

पुण्याच्या विकास आराखड्यात वाहतुकीची 'कोंडी' ?

03 मे

पुणे : दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि त्याबरोबरच बोर्‍या वाजलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. पण पुढच्या अनेक वर्षांचा विचार करुन तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये मात्र याचा विचार करण्यात आलेला नाही अशी टीका पेटिस्ट्रिशियन फर्स्ट या संस्थेच्या प्रशांत इनामदार यांनी केली आहे.

पुण्यामध्ये मेट्रो धावणार आहे. या मेट्रोच्या मार्गाच्या कडेने चार टक्के एफएसआय देण्याचा निर्णय झालेला आहे. पण या रस्त्याच्या रुंदीकरणाचा, वाहनांच्या संख्येचा,पार्किंगचा विचारच या विकास आराखड्यामध्ये करण्यात आलेला नाही. त्याबरोबरच पुण्यावरचा वाहतुकीचा भार कमी व्हावा यासाठी रिंग रोड प्रस्तावीत करण्यात आला.

मात्र कोथरुड मधल्या भागामध्येच वेगळं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे सलग बांधण्याचा प्रस्ताव असलेला हा रस्ता पूर्ण होणार कसा असा प्रश्न निर्माण झालाय. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याऐवजी त्याचा बोजवारा उडवणारा हा विकास आराखडा असणार आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2013 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close