S M L

पुण्यात एलबीटी विरोधात व्यापार्‍यांचा विराट मोर्चा

पुणे 14 मे : एलबीटीचा प्रश्न आता आणखी चिघळत चाललाय. पुण्यातील व्यापारी पुन्हा आक्रमक झाले असून आज व्यापार्‍यांनी भव्य मोर्चा काढलाय. बाजीराव रस्त्यावरून हा मोर्चा सुरू झाला. हजारो व्यापारी या मोर्च्यात सहभागी झालेत. सरकारविरोधी घोषणा देत एलबीटी रद्द करण्यासंदर्भातली प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव आणि व्यापार्‍यांच्या प्रतिनिधीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली मात्र यानंतर व्यापार्‍यांना इस्मा लागू केला जाईल असा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर व्यापार्‍यांचे परवाने रद्द केले जातील असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र काहीही झालं तरी माघार नाही परवाने आम्हीच सरकारला परत करु अशी भुमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे. दरम्यान, व्यापारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांची आजची बैठक रद्द झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 09:36 AM IST

पुण्यात एलबीटी विरोधात व्यापार्‍यांचा विराट मोर्चा

पुणे 14 मे : एलबीटीचा प्रश्न आता आणखी चिघळत चाललाय. पुण्यातील व्यापारी पुन्हा आक्रमक झाले असून आज व्यापार्‍यांनी भव्य मोर्चा काढलाय. बाजीराव रस्त्यावरून हा मोर्चा सुरू झाला. हजारो व्यापारी या मोर्च्यात सहभागी झालेत. सरकारविरोधी घोषणा देत एलबीटी रद्द करण्यासंदर्भातली प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

सोमवारी राज्याचे मुख्य सचिव आणि व्यापार्‍यांच्या प्रतिनिधीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली मात्र यानंतर व्यापार्‍यांना इस्मा लागू केला जाईल असा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर व्यापार्‍यांचे परवाने रद्द केले जातील असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र काहीही झालं तरी माघार नाही परवाने आम्हीच सरकारला परत करु अशी भुमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे. दरम्यान, व्यापारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांची आजची बैठक रद्द झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2013 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close