S M L

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतसह तिघांना अटक

नवी दिल्ली 16 मे : आयपीएलची धूम सुरु असतानाच आयपीएलला एक मोठा धक्का बसलाय. राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केली आहेत. फास्ट बॉलर श्रीसंत, ऑल राउंडर अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनी अटक केली. श्रीसंतला दिल्लीतून तर अंकित चव्हाण आणि चांदिलियाली मुंबईतून अटक केली गेली आहेत. बुधवारी रात्री 2.30 वाजता या दोघांना हॉटेल ट्रायडेंटमधून अटक केली गेली. त्यानंतर त्या तिघांना बीसीसीआयने निलंबित केलंय. या घटनेमुळे क्रिकेट जगताला तसेच क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्सचा मुंबईनं पराभव केला. या मॅचमध्येही स्पॉट फिक्सिंग झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. विशेष म्हणजे अटक झालेले तिन्ही खेळाडू भारतीय असल्यामुळे भारतीय क्रिकेटसाठी ही अत्यंत शरमेची गोष्ट मानली जातेय. बुधवारी मुंबईतून 3 सट्टेबाजांना अटक केली होती आणि त्यानंतर आज या 3 खेळाडूंना अटक झाली. त्यामुळे या दोन प्रकरणांचा एकमेकांशी संदर्भ आहे का हेही आता तपासून पाहिलं जाणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरण- राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप - खेळांडूबरोबरच 3 सट्टेबाजांना सुध्दा केली दिल्ली पोलिसांनी अटक - श्रीसंतला दिल्लीत तर अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया यांना मुंबईत अटक-खेळाडूंना 420 (फसवणूक), 120 ब (गुन्हेगारी कट) या कलमांखाली अटक- रात्री 2:30 वाजता मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमधून झाली खेळाडूंना अटक - सट्टेबाज रमेश व्यास याने केला या स्पॉट फिक्सिंगचा खुलासा स्पॉट फिक्सर खेळाडूएस श्रीसंत - वय: 30 वर्ष - भारताचा आघाडीचा फास्ट बॉलर- IPLमध्ये 'राजस्थान रॉयल्स' टीमचं प्रतिनिधित्व- याआधी 'किंग्ज इलेव्हन पंजाब' आणि 'कोची टस्कर्स' या टीमचंही प्रतिनिधित्व- भारताकडून आतापर्यंत 27 टेस्ट, 53 वन डे आणि 10 टी-20 मॅचेस- 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 वर्ल्डकप टीम्समध्ये सहभाग अजित चंदेलिया- वय: 29 वर्ष - IPLमध्ये 'राजस्थान रॉयल्स' टीमचं प्रतिनिधित्व- ऑलराऊंडर, ऑफ ब्रेक बॉलर - याआधी 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' टीमचंही केलं प्रतिनिधित्व- फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरयाणा टीमचं प्रतिनिधित्व- 2012: IPLमध्ये 'पुणे वॉरियर्स'विरूध्द घेतली होती हॅट्‌ट्रीक

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2013 08:45 AM IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतसह तिघांना अटक

नवी दिल्ली 16 मे : आयपीएलची धूम सुरु असतानाच आयपीएलला एक मोठा धक्का बसलाय. राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केली आहेत. फास्ट बॉलर श्रीसंत, ऑल राउंडर अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनी अटक केली.

श्रीसंतला दिल्लीतून तर अंकित चव्हाण आणि चांदिलियाली मुंबईतून अटक केली गेली आहेत. बुधवारी रात्री 2.30 वाजता या दोघांना हॉटेल ट्रायडेंटमधून अटक केली गेली. त्यानंतर त्या तिघांना बीसीसीआयने निलंबित केलंय. या घटनेमुळे क्रिकेट जगताला तसेच क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्सचा मुंबईनं पराभव केला.

या मॅचमध्येही स्पॉट फिक्सिंग झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. विशेष म्हणजे अटक झालेले तिन्ही खेळाडू भारतीय असल्यामुळे भारतीय क्रिकेटसाठी ही अत्यंत शरमेची गोष्ट मानली जातेय. बुधवारी मुंबईतून 3 सट्टेबाजांना अटक केली होती आणि त्यानंतर आज या 3 खेळाडूंना अटक झाली. त्यामुळे या दोन प्रकरणांचा एकमेकांशी संदर्भ आहे का हेही आता तपासून पाहिलं जाणार आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरण

- राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप - खेळांडूबरोबरच 3 सट्टेबाजांना सुध्दा केली दिल्ली पोलिसांनी अटक - श्रीसंतला दिल्लीत तर अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया यांना मुंबईत अटक-खेळाडूंना 420 (फसवणूक), 120 ब (गुन्हेगारी कट) या कलमांखाली अटक- रात्री 2:30 वाजता मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमधून झाली खेळाडूंना अटक - सट्टेबाज रमेश व्यास याने केला या स्पॉट फिक्सिंगचा खुलासा

स्पॉट फिक्सर खेळाडूएस श्रीसंत - वय: 30 वर्ष - भारताचा आघाडीचा फास्ट बॉलर- IPLमध्ये 'राजस्थान रॉयल्स' टीमचं प्रतिनिधित्व- याआधी 'किंग्ज इलेव्हन पंजाब' आणि 'कोची टस्कर्स' या टीमचंही प्रतिनिधित्व- भारताकडून आतापर्यंत 27 टेस्ट, 53 वन डे आणि 10 टी-20 मॅचेस- 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 वर्ल्डकप टीम्समध्ये सहभाग अजित चंदेलिया- वय: 29 वर्ष - IPLमध्ये 'राजस्थान रॉयल्स' टीमचं प्रतिनिधित्व- ऑलराऊंडर, ऑफ ब्रेक बॉलर - याआधी 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' टीमचंही केलं प्रतिनिधित्व- फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरयाणा टीमचं प्रतिनिधित्व- 2012: IPLमध्ये 'पुणे वॉरियर्स'विरूध्द घेतली होती हॅट्‌ट्रीक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2013 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close