S M L

पुण्याच्या आशिषने सर केला ल्होत्से शिखर !

पुणे 17 मे : पुण्याच्या आशिष माने या 22 वर्षांच्या तरूणाने ल्होत्से हे जगातलं चवथ्या क्रमांकांचं शिखर सर करण्याचा पराक्रम केलाय. आशिषनं गेल्या वर्षीच एव्हरेस्ट सर केलं होतं. ल्होत्से शिखर एव्हरेस्टच्या शेजारीच दक्षिण बाजूला आहे. एव्हरेस्टला जगभरातील गिर्यारोहक पसंती देत असताना, ल्होत्से हे शिखर मात्र काहीसे दुर्लक्षित आहे. हे शिखरही एव्हरेस्टप्रमाणेच 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंच आहे. मात्र, ते एव्हरेस्टपेक्षा 332 मीटर कमी आहे. अजित ताटे हे गिर्यारोहक आशिषबरोबर होते. तसंच लाकपा दिर्जी आणि पासंग शेर्पा हे शेर्पाही होते. गिरीप्रेमी या संस्थेच्या वतीन एव्हरेस्ट-ल्होत्से या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. उमेश झिरपे हे या मोहिमेचा ग्रुप लीडर होते. त्यांच्या ग्रुप मध्ये गणेश मोरे, आनंद माळी, भूषण गर्गे, आशीष माने, टेकराज अधिकारी आणि अजित ताटे यांचा सहभाग होता. या मोहिमेच्या माध्यमातून आशिषनं हा पराक्रम केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 09:13 AM IST

पुण्याच्या आशिषने सर केला ल्होत्से शिखर !

पुणे 17 मे : पुण्याच्या आशिष माने या 22 वर्षांच्या तरूणाने ल्होत्से हे जगातलं चवथ्या क्रमांकांचं शिखर सर करण्याचा पराक्रम केलाय. आशिषनं गेल्या वर्षीच एव्हरेस्ट सर केलं होतं.

ल्होत्से शिखर एव्हरेस्टच्या शेजारीच दक्षिण बाजूला आहे. एव्हरेस्टला जगभरातील गिर्यारोहक पसंती देत असताना, ल्होत्से हे शिखर मात्र काहीसे दुर्लक्षित आहे. हे शिखरही एव्हरेस्टप्रमाणेच 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंच आहे. मात्र, ते एव्हरेस्टपेक्षा 332 मीटर कमी आहे. अजित ताटे हे गिर्यारोहक आशिषबरोबर होते. तसंच लाकपा दिर्जी आणि पासंग शेर्पा हे शेर्पाही होते.

गिरीप्रेमी या संस्थेच्या वतीन एव्हरेस्ट-ल्होत्से या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. उमेश झिरपे हे या मोहिमेचा ग्रुप लीडर होते. त्यांच्या ग्रुप मध्ये गणेश मोरे, आनंद माळी, भूषण गर्गे, आशीष माने, टेकराज अधिकारी आणि अजित ताटे यांचा सहभाग होता. या मोहिमेच्या माध्यमातून आशिषनं हा पराक्रम केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2013 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close