S M L
  • मॉल, इमारतींनी 'गिळले' नाले !

    Published On: May 29, 2013 02:11 PM IST | Updated On: May 29, 2013 02:11 PM IST

    दीप्ती राऊत, नाशिकनाशिक 29 मे : पावसाळ्यात पावासाचं पाणी वाहून जाण्यासाठी नाले असणं आवश्यक असतं. मोठ मोठ्या शहरांमध्ये मात्र नाल्यावर सर्रास अतिक्रमण झाल्याचं आणि अनेक ठिकाणी नाले गायब झाल्याचं चित्र सर्वत्र बघायला. आयबीएन लोकमतच्या याच विषयावरच्या कँपेनमध्ये आपण यापूर्वी मुंबई, पुणे, नागपूर या शहरातल्या नाल्यंाची स्थिती पाहिली. झपाट्यानं वाढणारं नाशिकही याला अपवाद नाही.गोदावरीच्या कडेनं टेकड्यांवर बसलेल्या नाशिकची टोपोग्राफी नैसर्गिक नाल्यांना पूरक होती. म्हणूनच शहरातून बरेच लहानमोठे नाले गोदावरीच्या दिशेनं वाहताना दिसतात. ही गोष्ट फार दूरची नाही. पण 10 वर्षांपूर्वीपर्यंत दिसणारे ते नाले आज इतिहास बनलेत आणि त्याठिकाणी आलिशान मॉल उभे राहिलेत. महापालिकेतल्या माजी विरोधीपक्षनेत्यांनी शहरातल्या नाल्यांची माहिती महापालिकेकडे मागितली होती. पण ना माहिती मिळाली, ना नाले सापडले.नाले असलेल्या प्लॉटमध्ये असे भराव टाकले जातात. हळहळू नाला बुजतो आणि त्यावर इमले उभे राहातात. नाल्यांवर बांधलेल्या इमारती जागोजागी पाहायला मिळतात. मग हे नाले गायब केले कोणी? त्याची फळ कोणी चाखली आणि त्याची फळं कोण भोगणार? हेच प्रश्न नाशिककरांना दर पावसाळ्यात आता पडतात.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close