S M L

बारावीच्या निकालात मुलींची बाजी

पुणे 30 मे : 2012-13 या वर्षासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा संपूर्ण निकाल 79.95 टक्के इतका लागलाय. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारलीये. 84.06 टक्के मुली तर 76.62 टक्के मुलं पास झाली आहेत. यंदाच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सगळ्यात जास्त म्हणजे 85.88 टक्के इतका लागलाय. त्यापाठोपाठ औरंगाबाद विभागाने दुसर्‍या स्थानावर बाजी मारली आहे. पुढच्या वर्षापासून पर्यावरण शिक्षण या विषयाला ग्रेड ऐवजी पुढच्या गुण दिले जाणार असल्याचं, शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितलंय. प्राध्यापकांच्या संपामुळे निकाल खूप जास्त उशिरा लागलेला अशी शक्यता होती पण हा निकाल फक्त 20 दिवसच उशिरा लागल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलंय. तसंच वेळापत्रक एक वर्ष आधी दिल्यामुळे निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराhttp://mahresult.nic.in/hsc2013/hsc13.htm http://pages.rediff.com/exams/41365 ठळक मुद्देएकूण निकाल - 79.95 टक्केमुलींचीच बाजी - 84.04 टक्के मुली उत्तीर्ण कोकण विभागाचा निकाल सर्वाधिकनागपूर विभागाचा निकाल सर्वात कमीशाखाविज्ञान शाखा टक्केवारी - 91.30टक्केकला शाखा टक्केवारी - 70.92 टक्केवाणिज्य शाखा टक्केवारी - 74.86 टक्के व्यावसायिक अभ्यासक्रम - 89.95 टक्केविभाग- मुंबई विभाग - 76.81 टक्के - पुणे विभाग - 81.91 टक्के - औरंगाबाद विभाग - 85.26 टक्के - कोल्हापूर विभाग - 84.14 टक्के- नागपूर विभाग - 73.10 टक्के- कोकण विभाग - 85.88 टक्के- अमरावती विभाग - 82.19 टक्के- लातूर - 83.54 टक्के

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2013 09:43 AM IST

बारावीच्या निकालात मुलींची बाजी

पुणे 30 मे : 2012-13 या वर्षासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा संपूर्ण निकाल 79.95 टक्के इतका लागलाय. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारलीये. 84.06 टक्के मुली तर 76.62 टक्के मुलं पास झाली आहेत.

यंदाच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सगळ्यात जास्त म्हणजे 85.88 टक्के इतका लागलाय. त्यापाठोपाठ औरंगाबाद विभागाने दुसर्‍या स्थानावर बाजी मारली आहे.

पुढच्या वर्षापासून पर्यावरण शिक्षण या विषयाला ग्रेड ऐवजी पुढच्या गुण दिले जाणार असल्याचं, शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितलंय. प्राध्यापकांच्या संपामुळे निकाल खूप जास्त उशिरा लागलेला अशी शक्यता होती पण हा निकाल फक्त 20 दिवसच उशिरा लागल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलंय. तसंच वेळापत्रक एक वर्ष आधी दिल्यामुळे निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

http://mahresult.nic.in/hsc2013/hsc13.htm

http://pages.rediff.com/exams/41365

ठळक मुद्देएकूण निकाल - 79.95 टक्केमुलींचीच बाजी - 84.04 टक्के मुली उत्तीर्ण कोकण विभागाचा निकाल सर्वाधिकनागपूर विभागाचा निकाल सर्वात कमीशाखाविज्ञान शाखा टक्केवारी - 91.30टक्केकला शाखा टक्केवारी - 70.92 टक्केवाणिज्य शाखा टक्केवारी - 74.86 टक्के व्यावसायिक अभ्यासक्रम - 89.95 टक्के

विभाग

- मुंबई विभाग - 76.81 टक्के - पुणे विभाग - 81.91 टक्के - औरंगाबाद विभाग - 85.26 टक्के - कोल्हापूर विभाग - 84.14 टक्के- नागपूर विभाग - 73.10 टक्के- कोकण विभाग - 85.88 टक्के- अमरावती विभाग - 82.19 टक्के- लातूर - 83.54 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2013 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close