S M L

नयना पुजारी हत्याप्रकरणी अखेर मुख्य आरोपी अटकेत

पुणे 31 मे : पुण्यातल्या गाजलेल्या नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणातील फरार प्रमुख आरोपी योगेश राऊतला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी योगेशला अटक केली. गेल्या वर्षभरापासून योगेश फरार होता. नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणात पहिल्यांदा अटक केल्यानंतर तब्येत बिघडल्याच्या कारणावरून योगेशला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. आणि तिथून तो फरार झाला होता. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी नयना पुजारी 7 ऑक्टोबर 2009 मध्ये बेपत्ता झाली होती. त्यानंतर 9 तारखेला तिचा मृतदेह खेड परिसरात सापडला होता. त्यावेळी तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. तिच्या पर्समधून ATM कार्ड चोरीला गेलं होतं. त्या कार्डावर 45 हजार रुपये काढून घेतलं होतं. याप्रकरणी एसआयटीची सुध्दा स्थापनाही करण्यात आली होती. अखेर वर्षभरापासून फरार असलेला योगेश काल पोलिसांच्या ताब्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2013 07:47 AM IST

नयना पुजारी हत्याप्रकरणी अखेर मुख्य आरोपी अटकेत

पुणे 31 मे : पुण्यातल्या गाजलेल्या नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणातील फरार प्रमुख आरोपी योगेश राऊतला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी योगेशला अटक केली. गेल्या वर्षभरापासून योगेश फरार होता.

नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणात पहिल्यांदा अटक केल्यानंतर तब्येत बिघडल्याच्या कारणावरून योगेशला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. आणि तिथून तो फरार झाला होता. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी नयना पुजारी 7 ऑक्टोबर 2009 मध्ये बेपत्ता झाली होती. त्यानंतर 9 तारखेला तिचा मृतदेह खेड परिसरात सापडला होता.

त्यावेळी तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. तिच्या पर्समधून ATM कार्ड चोरीला गेलं होतं. त्या कार्डावर 45 हजार रुपये काढून घेतलं होतं. याप्रकरणी एसआयटीची सुध्दा स्थापनाही करण्यात आली होती. अखेर वर्षभरापासून फरार असलेला योगेश काल पोलिसांच्या ताब्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2013 07:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close