S M L

विद्यार्थ्यांनी मीडियाशी बोलल्यास 5 हजार रुपये दंड

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2013 07:50 PM IST

विद्यार्थ्यांनी मीडियाशी बोलल्यास 5 हजार रुपये दंड

pune27 जुलै : राज्य सरकारने पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर जाचक अटी घातल्या आहेत. सुलतानी परिपत्रक अशा शब्दात याचा निषेध करण्यात येतोय. विद्यार्थ्यांनी शिकत असलेल्या संस्थेच्या लेखी परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नये अशी अट घालण्यात आली आहे.

जर लेखी परवानगी न घेता स्वत:च्या शैक्षणिक संस्थांबद्दल विद्यार्थी मीडियासोबत बोलले तर गैरवर्तन समजून त्या विद्यार्थ्याकडून 5000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याआधी विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनासाठी आधी असलेला 300 रुपयांचा दंड आता वाढवून 5000 करण्यात आलाय.

सोमवारपासून याविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आंदोलन करणार आहे. तर पुण्यात भारतीय क्रांतीकारी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचा निषेध करणारं आंदोलनचं हाती घेतलंय. नाशिक, अहमदनगर आणि पुणे विभागातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2013 07:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close