S M L

अखेर विश्वास पाटलांची सुटकेस सापडली

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2013 09:09 PM IST

अखेर विश्वास पाटलांची सुटकेस सापडली

vishvash patil09 ऑगस्ट : ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांच्या कादंबरीचं हरवलेलं हस्तलिखित अखेर सापडलंय. नौपाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरीला गेलेली ही बॅग रेल्वेस्टेशनजवळ आढळली. या बॅगेत कादंबरीचे हस्तलिखित मिळाले मात्र चोराने पैसे लंपास केले.

 

गुरूवारी रात्री चोरट्यांनी पाटील यांच्या वाहनचालकाला भूल देऊ बॅग ाळवून नेली होती. ही घटना रात्री आठच्या सुमाराला घडली. मात्र पोलिसांनी वेगवान तपास करत सात तासांमध्ये ही हस्तलिखितांची बॅग हुडकून काढली. एक शेतकरी आपल्या गावासाठी, आपल्या दिवंगत पत्नीसाठी चालवलेल्या झुंजीचं ह्रदयस्पर्शी वर्णन असलेल्या '' पाषाणझुंज '' या कादंबरीचं लिखाण हे हस्तलिखित घेऊन ते गाडीनं ठाण्यातल्या राम मारूती रोडवरच्या मॅजेस्टीक बुक स्टॉलला पुस्तक खरेदी करण्यासाठी आले असताना अज्ञात चोरट्यांनी तुमचे पैसे पडले आहेत असं त्यांच्या वाहनचालकाला सांगितलं.

 

तो ते पैसे घेण्यासाठी खाली उतरताच दुसर्‍या बाजूनं दुसर्‍या चोरट्यानं त्यांची 200 पानं असलेल्या तीन फायलींमधली हस्तलिखितं आणि 10 ते 15 हजारांची रोकड असलेली राखाडी रंगाची बॅग चोरट्यांनी लंपास केली. लेखक विश्वास पाटील हे गेली साडेतीन वर्षं अविरतपणे या कांदंबरीचं लिखाण करत होते. अथक परिश्रमानं पाटील यांनी ही हस्तलिखितं तयार केली होती. ही हस्तलिखितं आपल्याला परत मिळावीत असं कळकळीतं आवाहन विश्वास पाटील यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2013 09:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close