S M L

राज्यपालांनी घेतली कुपोषणाची दखल

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2013 09:12 PM IST

Image img_200332_kshankarnaryanan_240x180.jpg12 ऑगस्ट : राज्यातील कुपोषणाची गंभीर दखल राज्यपाल के शंकरनारायणन यांनी घेतली आहे. राज्यातील कुपोषणाची स्थिती आणि सुरू असलेल्या उपाय योजना जाणून घेण्यासाठी राज्यापालांची पुण्यात बैठक बोलावलीय. या बैठकीला आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत. गेल्या महिनाभरापासून राज्यातील आदिवासी भागात कुपोषणामुळे अनेक बालकांचा बळी गेलाय. हा मुद्दा आयबीएन लोकमत ने उचलून धरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2013 09:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close