S M L

'वन्स अपॉन अ टाईम..'ला राष्ट्रवादीचा विरोध

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2013 08:58 PM IST

'वन्स अपॉन अ टाईम..'ला राष्ट्रवादीचा विरोध

15 ऑगस्ट: 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा' सिनेमा दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर आधारित असल्याचं कारण देत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केलाय.

आज पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड मल्टिफ्लेक्समध्ये या चित्रपटाचा शो दाखविण्यात येऊ नये या मागणी करिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिटी प्राईड मल्टिफ्लेक्सच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतलं.

15 ऑगस्ट या दिवशी अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये आणि 15 ऑगस्ट ला अशा प्रकारचा चित्रपट सिनेमागृहात दाखविण्यात येऊ नये, अशी मागणीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2013 08:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close