S M L

दाभोलकरांच्या खुनाचे ठोस पुरावे हाती नाहीत -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2013 04:29 PM IST

Image img_239812_cmonreccors_240x180.jpg26 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 6 दिवस उलटून गेलेत. पण एकही आरोपी अजून पकडलेला नाही. अजून पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले नाहीत त्यामुळे आरोपींना अटक करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

यामागचे सूत्रधार नेमके कोण आहेत, याचा तपास लागणं जास्त गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री सातार्‍यात दाभोलकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील कळू शकलेला नाहीये. गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांनी दाभोलकर कुटुंबीयांची दुसर्‍यांदा भेट घेतली.

तर डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध आणि आरोपींना पकडण्याची मागणी करत वेगवेगळ्या परिवर्तनवादी संघटनांनी आज पुण्यात मूक मोर्चा काढला. कलेक्टर ऑफिसवर काढलेल्या या मोर्चात तरूण मोठया संख्येनं सहभागी झाले होते. मारेकर्‍यांना तातडीनं अटक करा, अशी मागणी करत त्यांनी पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2013 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close