S M L

दाभोलकर कुटुंबीयांनी घेतली पोलीस आयुक्तींची भेट

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2013 09:44 PM IST

दाभोलकर कुटुंबीयांनी घेतली पोलीस आयुक्तींची भेट

dabholkar douter mukta dabholkar28 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एक आठवडा पूर्ण झालाय. पण अजूनही कोणताच ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास कुठपर्यंत आला आहे, याची माहिती घेण्यासाठी दाभोलकरांची मुलगी मुक्ता आणि मुलगा हमीद यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेतली.

अंनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुखही त्यांच्या सोबत होते. मात्र खुनाबाबत तपास सुरू आहे, अजूनही ठोस माहिती आलेली नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांना दिली.

हल्लेखोर ज्या दुचाकीवरून आले होते त्यानंबरच्या आतापर्यंत 74 गाड्या तपासलेल्या आहेत.110 सीसीटीव्ही फुटेज आहे त्यातलं 50 बघून झालंय. मॉर्निंग वॉकला येणार्‍या 96 प्रत्यक्षदर्शींना विचारपूस केली. मात्र एकाकडून आवश्यक माहिती मिळू शकली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तपास कुठपर्यंत?

- पुणे पासिंगच्या 7746 या नंबरच्या 74 गाड्या तपासल्या

- 110 सीसीटीव्ही फूटेजपैकी 50 फूटेज बघितले

- मॉर्निंग वॉकला येणार्‍या 96 प्रत्यक्षदर्शींची विचारपूस

- गाडी डुप्लिकेट नंबर प्लेटची आहे का याची चौकशी सुरू

- सुपारी किलर्सचा रेकॉर्ड मागवला

- पुण्यातल्या 200 आणि इतर ठिकाणच्या 700 गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स मागवलेत

पुणे पोलिसांचं आवाहन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी कोणतीही माहिती असल्यास संपर्क साधा

पुणे पोलीस - 020-26112222 किंवा 26208295 आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2013 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close