S M L

पीएमआरडीच्या अंतर्गत येणार लवासा, शरद पवारांना दणका

लवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा अखेर काल रद्द करण्यास आला असला तरी 2016च्या लोकलेखा समितीमध्येच यासंबंधी अनेक गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते.

Sonali Deshpande | Updated On: May 24, 2017 02:43 PM IST

पीएमआरडीच्या अंतर्गत येणार लवासा, शरद पवारांना दणका

24 मे : लवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा अखेर काल रद्द करण्यास आला असला तरी 2016च्या  लोकलेखा समितीमध्येच यासंबंधी अनेक गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. लवासाने बांधकाम करताना पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचं त्यात म्हटलं होतं. लवासा प्राधिकरणाचा विशेषाधिकार मिळाल्यामुळेच तिथं अनेक नियमबाह्य बांधकामं झाल्याचं अहवालात म्हटलंय.

तसंच विशेष प्राधिकरणासाठी सहा सदस्यांची टीम तयार करण्यात आली होती त्यात हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनीचे सर्वात जास्त सदस्य होते. यामुळे सरकारी नियंत्रणाशिवाय अनियमितता वाढण्यास मदत झाली. अनेक आराखडे आणि स्केचेस यांना अनियमित मान्यता देताना कुठल्याही पर्यावरण नियमांचं पालन नाही.  ठिकठिकाणी बंधारे मांडताना कुठल्याही नियमांचं पालन झालं नाही.

बुडीत क्षेत्रालगतच्या जमिनीवर इमारतींचं बांधकाम आदिवासींच्या जमिनीची नियमाबाहेर खरेदी राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये थंड हवेची ठिकाणं असताना लवासाची निवड का ? असाही प्रश्न लोकलेखा समितीच्या अहवालात उपस्थित करण्यात आला होता.

काय आहे लवासा?

- लवासा हे शरद पवारांचं स्वप्नवत शहर,

मालक अजित गुलाबचंद

- पीएमआरडीएच्या कार्यकक्षेत आणल्यामुळे

शरद पवारांना धक्का

- पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक तालुक्यांचा

विकास करण्यासाठी पीएमआरडीए

- पीएमआरडीए म्हणजे पुणे विकास

प्राधिकरण संस्था

- बांधकामासाठी आता पीएमआरडीएची

परवानगी घ्यावी लागणार

- आतापर्यंत लवासा स्वत:चं बांधकाम,

निर्णय, परवानग्या स्वत:च मंजूर करायचं

- आतापर्यंत लवासाला अमर्याद अधिकार

होते, आता त्याला छाटणी

- लवासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफरीचे

आरोप

- मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचाही लवासावर

आरोप

- हिल स्टेशन म्हणून विकास करणं अपेक्षित

होतं पण नियमाला बगल

- लवासानं पुण्यासहित आसपासच्या गावाचंही

पाणी बांधकामासाठी पळवल्याचा आरोप

- आदिवासींच्या जमिनी लवासानं लाटल्याचा

आरोप, तुटपुंजे पैसे दिल्याचेही आरोप

- लवासा सध्या 4 हजार कोटी रूपयांच्या

तोट्यात असल्याची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2017 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close