S M L

खोडदगावात फुटबाॅलचा फिव्हर, ऊन असो पाऊस मुलींनी लगावले दणादण गोल

पुणे जिह्यातील खोडदच्या महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर ही प्रॅक्टिस सुरू आहे फुटबॉलची आणि सहभागी आहेत 5वी ते 10 वीच्या मुली.फक्त एक दिवस नाही तर रोजच इथे हे फुटबॉल मिशन सुरू असते.

Sonali Deshpande | Updated On: Sep 15, 2017 04:03 PM IST

खोडदगावात फुटबाॅलचा फिव्हर, ऊन असो पाऊस मुलींनी लगावले दणादण गोल

पुणे, रायचंद शिंदे, 15 सप्टेंबर :  राज्यातील सर्व शाळांमध्ये आज फुटबॉल मिशन सुरू होतं.मात्र गावकरी आणि युवकांच्या पुढाकाराने रोजच फुटबॉल खेळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातायेत ते मागील 2 वर्षांपासून. तेही एका छोट्याश्या खेडेगावात आणि हा खेळ खेळतायेत खोडद गावच्या मुली.

पुणे जिह्यातील खोडदच्या महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर ही प्रॅक्टिस सुरू आहे फुटबॉलची आणि सहभागी आहेत 5वी ते  10 वीच्या मुली.फक्त एक दिवस नाही तर रोजच इथे हे फुटबॉल मिशन सुरू असते.फुटबॉलसोबत इतरही खेळाची इथे प्रॅक्टिस सुरू असते.

या मिशनसाठी 2 वर्षांपूर्वी ग्रामस्थ एकत्र आले आणि आहे त्या सुविधांचा वापर करत ही मुलं रोज नित्याने प्रॅक्टिस करतायेत.त्यामुळे या मुलांनाही फायदा होतोयच. पण ठिकठिकाणी बक्षीसही मिळतायेत.ग्राउंड असेल किंवा ड्रेस कोड तोही काही दात्यांनी उपलब्ध करून दिला.यामुळे या मुलांमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे.

फुटबॉल मिशन 1 मिलियन कार्यक्रमांतर्गत आज राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ खेळण्यात आला. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन ( फिफा) मार्फत 17 वर्षांखालील खेळाडूंसाठी फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा 6 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत देशात होणार आहेत.यातील 6 सामने नवी मुंबईत होणार आहेत.

या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन 1 मिलिनीअन कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं आहे.त्याचाच एक भाग राज्यात फुटबॉल या खेळाची आवड निर्माण  व्हावी आणि अधिकाधिक मुले फुटबॉल खेळन्यास प्रवृत्त व्हावीत  यासाठी हा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे मात्र फक्त एक दिवस हा उपक्रम न करता ज्या शाळा आणि गावकरी या साठी पुढे येतात त्यांच्यासाठी सुविधाही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.तरच हे मिशन सफल होईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close