होम  »  देश-विदेश   »  बहुमताचं गणित सुटलं ; राष्ट्रपती प्रणवदाच !

16 जून


प्रणव मुखर्जी नवे राष्ट्रपती होणार हे आता जवळपास निश्चित आहे. सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मुखजीर्ंकडे 49 टक्के मते आहेत. त्यांना आता केवळ 2 टक्के मतं हवी आहेत. बीजेडी आणि तृणमूल काँग्रेस जरी कलाम यांच्या नावावर ठाम असले, तरी एपीजे अब्दूल कलाम लवकरच माघार घोषित करण्याची शक्यता आहे. पी ए संगमा मात्र निडवणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मुखर्जी विरुद्ध संगमा अशी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निवडणूक लढवायची की नाही, यावरून एनडीएत संभ्रमात आहे. एनडीएनने निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. राष्ट्रपतीपदासाठी 5,87,351 मत आमच्याकडे आहेत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे प्रणवदा राष्ट्रपती बनणार हे निश्चित झाले आहे.


मतांची टक्केवारी

यूपीए + समर्थक ( तृणमूल वगळता) - 49%
यूपीए + समर्थक + डावे ( तृणमूल वगळता) - 54%
यूपीए + समर्थक + डावे + जेडीयू ( तृणमूल वगळता) - 58%
यूपीए + समर्थक + डावे + एनडीए ( तृणमूल वगळता) - 82%
 

Rate this article:
Average User rating on this article: 2 out of 5
प्रतिक्रिया

Posted by एक सोलापूरकर

एखादा मंत्री राष्ट्रपती होत असेल तर या देशाला राष्ट्रपतीची गरजच काय ?

Posted by एक सोलापूरकर

राष्ट्रपती पदासाठी एखाद्या मंत्र्याची निवड होणे हे भारतासाठी व भारतीय जनतेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.राष्ट्रपती पदासाठीचे मतदान पूर्ण देशात घेण्यात यावे.  तसे झाल्यास जनता डॉ. कलाम यांना निवडून देईल. मंत्री तर दूरच.

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

फिक्सिंगला आळा घालण्यासाठी बेटिंग प्रकाराला कायदेशीर मान्यता द्यावी का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]