होम » राज्य » सुसरी धरणाविरोधात वसई पालिकेवर मोर्चा
16 जून
डहाणूतलं सुसरी धरण रद्द करण्यासाठी वसई विरार शहर महानगर पालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आदिवासी महिला सामिल झाल्या होत्या. डहाणू रानशेत गावाजवळ सुसरी धरण प्रस्तावित आहे. या धरणासाठी 774 हेक्टर खाजगी आणि 114 हेक्टर वनजमीन जाणार आहे. त्यामुळे तीन गावातील 13 पाडे म्हणजे 3 हजार 551 लोक विस्थापित होणार आहेत असा येथील कार्यकर्त्यांचा आरोप आहे. डहाणूतील जमीन दुस-यांना पाणी देण्यासाठी का द्यावी ज्यांना पाणी हवे आहे त्यांनी त्यांच्या जागेत धरण सिडकोनं सुचवलेल्या ठिकाणी बांधावं. वसईसाठी दूर धरण हे बिल्डरांच्या भल्यासाठी बांधत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
Rate this article:
Average User rating on this article: 0 out of 5
बातम्या
आंतरराष्ट्रीय









