होम  »  मुंबई   »  राज ठाकरेंनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

16 जुलै


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम करुन स्वत:चा गड स्थापन केला आणि त्यानंतर दोन्ही सख्ख्या चुलत भावात राजकारणाच्या आखाड्यात बर्‍याचवेळा तू-तू-मैं-मैं झाली. एवढचं नाही तर पार हमरीतुमरीवर येण्याची वेळ आली. मात्र आज उध्दव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ही वार्ता राज यांना कळताच आपला नियोजित दौर्‍या अर्ध्यावर आटोपून उध्दवदादांची भेट घेतली. तब्बल साडेतीन वर्षांनंतर ही भेट झाली.

 

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना आज सकाळी लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळापूर्वी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. सध्या उध्दव यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, अलिबागमधला आपला नियोजित कार्यक्रम सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये सहकुटुंब भेट घेतली. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी एकमेकांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या तब्बेतीची फोनवरुन विचारपूस केली.
 

Rate this article:
Average User rating on this article: 4 out of 5
प्रतिक्रिया

Posted by tanaji

जो दुखाच्या काळात मदत करतो तोच खरा भाउ................

Posted by tanaji

जो दुखाच्या काळात मदत करतो तोच खरा भाउ................

Posted by Nandkumar

शेवटी रक्ताचे नाते आहे.........सहज तोडता येत नाही..........

1
. 2 .

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

फिक्सिंगला आळा घालण्यासाठी बेटिंग प्रकाराला कायदेशीर मान्यता द्यावी का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]