होम  »  मुंबई   »  राज ठाकरे घेणार बाळासाहेबांची भेट

16 जुलै

राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. उध्दव यांच्या प्रकृतीबद्दल बाळासाहेबांची चर्चा करणार आहे. त्यांनंतर संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उध्दव यांची भेट घेणार आहे. तसेच लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहे.

 

आज सकाळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळापूर्वी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. सध्या उध्दव यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, अलिबागमधला आपला नियोजित कार्यक्रम सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांची कुटुंबींयासह भेट घेतली.

 

सहा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम केल्यानंतर नोव्हेंबर 2008 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तब्येतीची विचारपुस करण्यासाठी मातोश्रीवर भेट घेतली होती. यावेळी उध्दव ठाकरेही हजर होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात राज-उध्दव एकत्र यावं अशी इच्छा खुद्द बाळासाहेबांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखती व्यक्त केली होती. बाळासाहेबांच्या या इच्छेला राज यांनी प्रतिसाद दिला होता. मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आजही आहे त्यांच्यासाठी मी शंभर पाऊलं पुढे टाकेल असं राज ठाकरे म्हणाले होते. आता हे सगळं घडल्यानंतर आज तब्बल साडेतीनवर्षांनंतर राज ठाकरे बाळासाहेबांची भेट घेणार आहे.

 

संबंधित बातम्या 

 

साडेतीन वर्षांनंतर राज-उध्दव भेट(व्हिडिओ)

 

राज ठाकरेंनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5
प्रतिक्रिया

Posted by Balu Garje

Both are coming to for 2014 election

Posted by sandip darekar

ठीक आहे त्यात काय एवडे शेवटी ते एकत्र राहीले आहे.मला वाटत यात काही राजकारण नसावे .

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

फिक्सिंगला आळा घालण्यासाठी बेटिंग प्रकाराला कायदेशीर मान्यता द्यावी का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]