होम  »  राज्य   »  गैरहजर राहिली म्हणून विद्यार्थिनीला कपडे उतरवण्याची शिक्षा

16 जुलै


वर्गात गैरहजर राहिल्याच्या कारणावरून तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीला भर वर्गात कपडे उतरवण्याची शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. याप्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षिका वायसे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.

 

शहरातील कवीवर्य मोरोपंत शिक्षण संस्थेच्या अमराईतल्या शाळेत हा प्रकार घडला. बुधवारी वर्गात गैरहजर राहिल्यामुळे शिक्षिका वायसे यांनी या मुलीसह तीन मुली आणि तीन मुलांना भर वर्गात कपडे उतरवण्याची शिक्षा केली. संध्याकाळी ही मुलगी घरी पोहचल्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी झालेला प्रकार मुलीचा आईला सांगितला.

 

याबद्दल शिक्षिकेला जाब विचारला असता 'तुम्ही मोठ्या मॅडमला विचारा,माझ्याशी बोलू नका' असं उत्तर वायसे यांनी दिलं. अखेर पालकांनी झालेल्या प्रकारबद्दल पोलिसांत तक्रार केली असता शिक्षिका वायसेला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणाबद्दल सोमवारी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिक्षिकेवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच बारामतीच्या डोर्लेवाडी या गावात गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक दोन विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृह साफ करुन घेत असल्याचं उघड झालं होतं.


 

Rate this article:
Average User rating on this article: 4 out of 5
प्रतिक्रिया

Posted by rahul b.pophale

give more punishment to that madam

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

एलबीटीबाबत शरद पवारांनी खरंच शिष्टाई केली आहे का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]