होम » मनी मार्केट » सत्यमच्या शेअर्समध्ये 30 टक्के घसरण
17 डिसेंबर, मुंबई
भारतीय शेअरबाजारात आज सत्यमचा स्टॉक तीस टक्के खाली उतरला . सत्यम कॉम्प्युटर्सचा स्टॉक कोसळण्यासाठी कारण ठरलेला सौदा रद्द झाल्याचं कंपनीनं जाहीर केलं. याचाच परिणाम म्हणून ही घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे.
सत्यम कॉम्प्युटर सर्विेससचे अध्यक्ष रामलिंगा राजू यांनी काल संध्याकाळी उशीरा मेटाज प्रॉपर्टीज आणि मेटाज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांमध्ये हिस्सा खरेदी करत असल्याची घोषणा केली होती. हा सुमारे एक अब्ज साठ कोटी डॉलर्सचा सौदा होता . मात्र कंपनीच्या बहुतेक शेअर्सधारकांना विश्वासात न घेता झालेल्या या सौद्यावर शेअर्सधारकांनी तीव्र आक्षेप घेतला. या सौद्याची घोषणा झाल्यानंतर सत्यमचा एडिआरदेखील काल युएस मार्केटमध्ये बारा डॉलर्सवरुन पाच डॉलर्स इतका कोसळला होता. रामलिंग राजू यांनी गुंतवणूकदारांच्या हितासाठीच हा सौदा रद्द केलाय असं स्पष्टीकरण आता दिलं आहे.

Rate this article:
Average User rating on this article: 0 out of 5
बातम्या
देश
आंतरराष्ट्रीय