होम » व्हिडिओ»साडेतीन वर्षांनंतर राज-उध्दव भेट
16 जुलै
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम करुन स्वत:चा गड स्थापन केला आणि त्यानंतर दोन्ही सख्ख्या चुलत भावात राजकारणाच्या आखाड्यात बर्याचवेळा तू-तू-मैं-मैं झाली. एवढचं नाही तर पार हमरीतुमरीवर येण्याची वेळ आली. मात्र आज उध्दव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ही वार्ता राज यांना कळताच आपला नियोजित दौर्या अर्ध्यावर आटोपून उध्दवदादांची भेट घेतली. तब्बल साडेतीन वर्षांनंतर ही भेट झाली.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना आज सकाळी लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळापूर्वी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. सध्या उध्दव यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, अलिबागमधला आपला नियोजित कार्यक्रम सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये सहकुटुंब भेट घेतली. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी एकमेकांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या तब्बेतीची फोनवरुन विचारपूस केली.
व्हिडिओ
टॉप व्हिडिओ
मोस्ट वॉण्टेड


















