S M L

प्रसूती रजेनंतर आता 'पिरियड लिव्ह'ची मागणी

मुंबईतल्या कल्चर मीडिया या मीडिया कंपनीने मात्र मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ती कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असावी.

Chandrakant Funde | Updated On: Jul 12, 2017 07:57 PM IST

प्रसूती रजेनंतर आता 'पिरियड लिव्ह'ची मागणी

 

मुंबई, 12 जुलै : मुंबईतल्या कल्चर मशिन या मीडियाबेस कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची रजा मंजूर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही अशाच पद्धतीची मागणी होऊ लागलीय. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी यासंबंधीचा ठराव मांडण्यासंबंधीचं पत्र देखील महापालिकेला दिलंय. शासकीय आणि निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांना 'मासिक पाळी'ची किमान एक दिवसाची रजा दिली जावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारलाही केलीय. शीतल म्हात्रे यांच्या या पत्रामुळे सरकारी तसंच खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना 'पिरियड लिव्ह' मंजूर व्हावी का अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झालीय.

डोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणइ इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेणार नाहीत त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे. परदेशातील अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पिरियड लिव्ह देण्याची पद्धत आता रुजत आहे. पण भारतात पिरियड लिव्ह देण्याची तशी पद्धत नाही. पण मुंबईतल्या कल्चर मीडिया या मीडिया कंपनीने मात्र मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ती कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असावी. ही कंपनी युट्यूब चॅनेल चालवते. या कंपनीत ७५ महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचं नवं धोरण या कंपनीने गेल्या 1 जुलैपासून सुरू केलं आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी त्रास जास्त होते तेव्हा त्यांना रजा देण्याचं कंपनीनं ठरवलं आहे. ऑक्टोबर माहिन्यात ब्रिटनस्थित 'कोएक्झिस्ट' या कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिला कर्मचा-यांना सुट्टी देण्याचं जाहीर केलं होतं. अशी सुट्टी देणारी ती ब्रिटनमधली पहिली कंपनी होती. कंपनीने या काळात महिलांना घरुन काम करण्याची मुभा देखील दिली.

'मासिक पाळी'दरम्यान काय त्रास होतो ?

मासिक पाळीच्या त्या पाच दिवसांत होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासातून प्रत्येक महिला जात असते. पाय, कंबर पोटात दुखणं, चालण्यास त्रास होणं, शारीरिक आणि मानसिक थकवा त्यामुळे होणारे 'मूड स्विंग्स' अशा अनेक गोष्टींचा त्रास तिला होत असतो. असे विषय चारचौघांत सांगणंही अनेकींना सोयीचं वाटत नाही. त्यातून 'वर्किंग वूमन'च्या बाबतीत ही समस्या तर अधिक गंभीर आहे. आपल्याला होणारा त्रास खुलेपणाने सांगता येत नाही तेव्हा मासिक पाळीच्या काळात महिला आजारी असल्याचे कारण सांगून कार्यालयात अनुपस्थित राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 07:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close