S M L

भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Nov 7, 2013 10:14 PM IST

भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात

rohit sharma7 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये तब्बल 2 दशकाहून अधिक काळ मैदान गाजवणारा सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होतोय, आणि त्याचवेळी भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होतेय.

 

 

कोलकाता टेस्ट मॉॅचमध्ये रोहित शर्मा आणि शमी मोहम्मदसाठी खास ठरली आहे. या दोन्ही खेळाडूंनी टेस्ट मॉॅचमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच दमदार कामगिरी करत आपली छापही उमटवली, काल मॉॅचपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रोहित आणि शमीला टेस्ट कॅप प्रदान केली आणि टेस्ट पदार्पणातच या दोनही खेळाडूंनी संधीच सोनं केल आहे. विशेष म्हणजे भारतीय टीम अडचणीत असताना रोहितनं सावध बॅटिंग करत इनिंग सावरली आणि भारताला आघाडी मिळवून दिली. तर काल पहिल्या दिवशी शमी मोहम्मदनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत.

 

नुकतीच ऑस्ट्रेलिय विरुद्ध झालेल्या वन डे सीरिजच्या शेवटच्या मॉॅचमध्ये रोहितने डबल सेंच्युरी झळकावली होती आणि आता टेस्ट पदार्पणात सेंच्युरी करत त्याने आपल्या नावावर आणखी एक रेकॉर्ड जमा केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये रोहितने 158 बॉल्समध्ये 209 रन्स केले होते याशिवाय शेन वॉटसनचा 15 सिक्सरचा रेकॉर्ड मोडत रोहितनं तब्बल 16 सिक्सर लगावले आहेत. सचिन आणि सेहवागनंतर वनडे मध्ये डबल सेंच्युरी झळकावणारा रोहित शर्मा हा तिसरा भारतीय खिलाडू आहे आणि आता टेस्ट पदार्पणात सेंच्युरी करणारा तो भारताचा 14 वा खेळाडू ठरलाय.

 

भारत आणि वेस्ट इंडजदरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डनवर दुसर्‍या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी खचाखच गर्दी झाली. ही गर्दी होती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहण्यासाठी. ओपनर मुरली विजय आऊट झाल्यानंतर सचिन क्रीझवर आला आणि स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या हजारो क्रिकेटप्रेमींना उभं राहून सचिनचं जल्लोषात स्वागत केलं. सचिननंही बॅट वर करुन क्रिकेटप्रेमींची मानवंदना स्वीकारली,दोन फोर मारत सचिननं सुरुवातही चांगली केली,त्याच्या प्रत्येक रनला प्रेक्षकांच्या टाळ्या पडत होत्या, पण 10 रन्सवर असताना सचिन दुर्देवीरित्या आऊट झाला आणि स्टेडिअममध्ये एकच शांतता पसरली. अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका सचिनला बसला,शिलिंगफोर्डचा स्पीन बॉल त्याच्या मांडीवर आदळला आणि अंपायरनं सचिनला लगेचच आऊटही दिलं पण ऍक्शन रिप्लेमध्ये बॉल स्टम्पच्या किमान एक फूट वरुन जात असल्याचं स्पष्ट दिसत होत, असं जरी असलं तरी भारताची युवा पिढी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2013 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close