S M L

अष्टपैलू जॅक कॅलिसची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Samruddha Bhambure | Updated On: Dec 25, 2013 07:42 PM IST

अष्टपैलू जॅक कॅलिसची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

25 डिसेंबर :  दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिसने आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दुसरा कसोटी सामना हा कॅलिसचा शेवटचा सामना असणार आहे.

जॅक कॅलिसने वन डे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधून जरी कॅलिसने निवृत्ती घेतली असली तरी, वन डे टेस्ट सामन्यांमधून या 'नंबर वन' अष्टपैलूची खेळी यापुढेही पहावयास मिळेल.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी जॅक कॅलिसचे आतापर्यंत बहुमोलाचे योगदान लाभले आहे. कॅलिसने 1995मध्ये इंग्लंडविरोधात टेस्ट पदार्पण केलं आणि तेव्हापासून गेल्या 18 वर्षांत त्यांने 165 टेस्ट खेळल्या आहेत. आतापर्यंत त्यानं 55 च्या सरासरीनं 13 हजार 174 रन्स केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटच्या रेकॉर्डमध्ये रन्सच्या बाबतीत त्याचा चौथा क्रमांक आहे. सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग आणि राहुल द्रविड हे इतर तीन क्रिकेटरनाच त्यापेक्षा जास्त टेस्ट रन्स करण्यात यश आलं. त्यानं 44 सेंच्युरीज आणि 58 हाफ-सेंच्युरीज केल्या आहेत.

 

बॉलिंगमध्येही त्याने करामत दाखवत 32.53च्या सरासरीनं त्यानं तब्बल 292 विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय अष्टपैलुत्वाची चमक दाखवणारी आणखी एक कामगिरी त्याने केली ती म्हणजे आतापर्यंत टेस्टमध्ये त्यानं तब्बल 199 कॅचेस घेतलेत. त्यामुळे आता दुसर्‍या टेस्टमध्ये 300 विकेट्स आणि 200 कॅचेस पूर्ण करतो का याकडे सगळ्या क्रिकेट प्रेमींच लक्ष असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2013 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close