S M L

डिकी बर्ड यांच्या टीममधून सचिन,लारा 'आऊट'

19 एप्रिलआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय अंपायर म्हणून नावाजलेल्या डीकी बर्ड यांनी आपली सर्वोत्तम टेस्ट टीम जाहीर केली आहे. बर्ड यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. पण बर्ड यांनी जाहीर केलेल्या टेस्ट टीममध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा आणि सर डॉन ब्रॅडमन यांचा मात्र समावेश केला नसल्यानं क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त होतंय. लिटील मास्टर सुनिल गावसकर हे एकमेव भारतीय खेळाडू बर्ड यांच्या टीममध्ये आहेत. तर पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान हे या टीमचे कॅप्टन आहेत. बर्ड यांनी मैदानावर अनेक दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहिलंय. पण टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या टॉप 10 खेळाडूंपैकी एकाचाही त्यांच्या ड्रीम टीममध्ये समावेश नाही. इतकंच नाही, तर क्लाईव्ह लॉईड, माल्कम मार्शल, ग्लेन मॅकग्रा, मुथय्या मुरलीधरन यांचाही समावेश केलेला नाही.डिकी बर्ड यांची टेस्ट टीमसुनील गावसकर, (भारत) बॅरी रिचर्डस, (द.आफ्रीका)व्हीव रिचर्डस, (वेस्ट इंडिज)ग्रेग चॅपेल, (ऑस्ट्रेलिया )ग्रॅम पोलॉक, (द.आफ्रीका)गारफिल्ड सोबर्स, (वेस्ट इंडिज)ऍलन नॉट, (इंग्लंड)इम्रान खान (कॅप्टन), (पाकिस्तान)शेन वॉर्न, (ऑस्ट्रेलिया)डेनिस लिली, (ऑस्ट्रेलिया)लान्स गिब्स (वेस्ट इंडिज)

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 01:38 PM IST

डिकी बर्ड यांच्या टीममधून सचिन,लारा 'आऊट'

19 एप्रिल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय अंपायर म्हणून नावाजलेल्या डीकी बर्ड यांनी आपली सर्वोत्तम टेस्ट टीम जाहीर केली आहे. बर्ड यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. पण बर्ड यांनी जाहीर केलेल्या टेस्ट टीममध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा आणि सर डॉन ब्रॅडमन यांचा मात्र समावेश केला नसल्यानं क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त होतंय. लिटील मास्टर सुनिल गावसकर हे एकमेव भारतीय खेळाडू बर्ड यांच्या टीममध्ये आहेत. तर पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान हे या टीमचे कॅप्टन आहेत. बर्ड यांनी मैदानावर अनेक दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहिलंय. पण टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या टॉप 10 खेळाडूंपैकी एकाचाही त्यांच्या ड्रीम टीममध्ये समावेश नाही. इतकंच नाही, तर क्लाईव्ह लॉईड, माल्कम मार्शल, ग्लेन मॅकग्रा, मुथय्या मुरलीधरन यांचाही समावेश केलेला नाही.

डिकी बर्ड यांची टेस्ट टीम

सुनील गावसकर, (भारत) बॅरी रिचर्डस, (द.आफ्रीका)व्हीव रिचर्डस, (वेस्ट इंडिज)ग्रेग चॅपेल, (ऑस्ट्रेलिया )ग्रॅम पोलॉक, (द.आफ्रीका)गारफिल्ड सोबर्स, (वेस्ट इंडिज)ऍलन नॉट, (इंग्लंड)इम्रान खान (कॅप्टन), (पाकिस्तान)शेन वॉर्न, (ऑस्ट्रेलिया)डेनिस लिली, (ऑस्ट्रेलिया)लान्स गिब्स (वेस्ट इंडिज)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2013 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close