S M L

ऑल इज 'गेल', 30 बॉलमध्ये झळकावले शतक

बंगलोर (23 एप्रिल 13 ): ख्रिस गेल नावाच्या वादळाने आज बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सिक्स,फोरची बरसात करत धुमशान घातलं. गेलने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 30 बॉलमध्ये शतक करण्याचा इतिहास रचला आहे. गेल नावाच वादळ इथंच थांबलं नाही तर त्यांने 51 बॉलमध्ये दीडशतक पूर्ण केलं आणि नाबाद 175 रन्स ठोकले. गेलच्या तुफान खेळीच्या बळावर बंगलोरने 263 धावांचा डोंगर उभा केला. याला प्रतिउत्तर देताना पुणे वॉरियर्स 133 रन्सवर गारद झाला. बंगलोरने दणदणीत 130 धावांनी विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पुणे वॉरियर्सदरम्यान मॅचला सुरुवातीला पावसानं हजेरी लावल्यानं खेळ काही वेळ थांबवण्यात आला होता. पण मॅच सुरु झाल्यानंतर मैदानात आणखी एक वादळ आलं... हे वादळाचं नाव होतं ख्रिस गेल... बंगलोरचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला. सिक्स आणि फोरची बरसात करत गेलनं आयपीएलमध्ये वेगवान सेंच्युरी नोंद केली. अवघ्या 30 बॉलमध्ये गेलनं सेंच्युरी ठोकली. आणि यात तब्बल 11 सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. आयपीएलमधली ही सर्वात वेगवान सेंच्युरी ठरली आहे. सेंच्युरी नंतरही गेलचा धडाका सुरुच राहिला. पुढे त्यांने 51 बॉलमध्ये दीडशतक पूर्ण केलं. 20 ओव्हर पूर्ण होई पर्यंत गेलने 66 बॉलमध्ये नाबाद 175 रन्स केले. तब्बल 13 फोर आणि 17 सिक्स लगावत त्याने नवा इतिहास रचला आहे. गेल एका बाजूने पुणे वॉरियर्सच्या बॉलरची धुलाई करत होता त्याला सोबत देणार्‍या तिलकरत्न दिलशान आणि एबी डी व्हिलेर्सनेही हात धुवून घेतले. दिलशानने 36 बॉलमध्ये एक सिक्स लगावत 33 रन्स केले तर एबी डी व्हिलेर्सने 8 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्स लगावत 31 रन्स कुटले. गेलच्या तुफानी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्सने पुणे वॉरियर्सला 264 धावांचे आव्हान दिलं आहे. आयपीएलमधला हा हायेस्ट स्कोर ठरला. 264 धावांचा पाठलाग करणारे पुणे वॉरियर्स 9 विकेट गमावत 133 रन्सवर गारद झाले. विशेष म्हणजे ख्रिस गेलनं बॉलिंगमध्येही कमाल केली. त्यानं 2 विकेट घेतल्या. फास्टेस्ट सेंच्युरीप्लेअर बॉल्स फोर सिक्स ख्रिस गेल (बंगलोर रॉयल चॅलेंजर्स)300811युसुफ पठाण (राजस्थान रॉयल्स)370908ऍडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स)420909सनथ जयसूर्या(मुंबई इंडियन्स)4507 10ख्रिस गेल (बंगलोर रॉयल चॅलेंजर्स) 460909IPL मधील हायेस्ट स्कोरप्लेअर रन्स बॉल्स फोरसिक्सख्रिस गेल (बंगलोर)175661317ब्रँडन मॅक्युलम (कोलकाता)158*731013मुरली विजय (चेन्नई) 127560811पॉल वलथाडी (पंजाब) 120*631902वीरेंद्र सेहवाग (दिल्ली) 119561306

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 12:09 PM IST

ऑल इज 'गेल', 30 बॉलमध्ये झळकावले शतक

बंगलोर (23 एप्रिल 13 ): ख्रिस गेल नावाच्या वादळाने आज बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सिक्स,फोरची बरसात करत धुमशान घातलं. गेलने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 30 बॉलमध्ये शतक करण्याचा इतिहास रचला आहे. गेल नावाच वादळ इथंच थांबलं नाही तर त्यांने 51 बॉलमध्ये दीडशतक पूर्ण केलं आणि नाबाद 175 रन्स ठोकले. गेलच्या तुफान खेळीच्या बळावर बंगलोरने 263 धावांचा डोंगर उभा केला. याला प्रतिउत्तर देताना पुणे वॉरियर्स 133 रन्सवर गारद झाला. बंगलोरने दणदणीत 130 धावांनी विजय मिळवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पुणे वॉरियर्सदरम्यान मॅचला सुरुवातीला पावसानं हजेरी लावल्यानं खेळ काही वेळ थांबवण्यात आला होता. पण मॅच सुरु झाल्यानंतर मैदानात आणखी एक वादळ आलं... हे वादळाचं नाव होतं ख्रिस गेल... बंगलोरचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला. सिक्स आणि फोरची बरसात करत गेलनं आयपीएलमध्ये वेगवान सेंच्युरी नोंद केली. अवघ्या 30 बॉलमध्ये गेलनं सेंच्युरी ठोकली. आणि यात तब्बल 11 सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. आयपीएलमधली ही सर्वात वेगवान सेंच्युरी ठरली आहे. सेंच्युरी नंतरही गेलचा धडाका सुरुच राहिला. पुढे त्यांने 51 बॉलमध्ये दीडशतक पूर्ण केलं. 20 ओव्हर पूर्ण होई पर्यंत गेलने 66 बॉलमध्ये नाबाद 175 रन्स केले. तब्बल 13 फोर आणि 17 सिक्स लगावत त्याने नवा इतिहास रचला आहे. गेल एका बाजूने पुणे वॉरियर्सच्या बॉलरची धुलाई करत होता त्याला सोबत देणार्‍या तिलकरत्न दिलशान आणि एबी डी व्हिलेर्सनेही हात धुवून घेतले. दिलशानने 36 बॉलमध्ये एक सिक्स लगावत 33 रन्स केले तर एबी डी व्हिलेर्सने 8 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्स लगावत 31 रन्स कुटले. गेलच्या तुफानी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्सने पुणे वॉरियर्सला 264 धावांचे आव्हान दिलं आहे. आयपीएलमधला हा हायेस्ट स्कोर ठरला. 264 धावांचा पाठलाग करणारे पुणे वॉरियर्स 9 विकेट गमावत 133 रन्सवर गारद झाले. विशेष म्हणजे ख्रिस गेलनं बॉलिंगमध्येही कमाल केली. त्यानं 2 विकेट घेतल्या. फास्टेस्ट सेंच्युरी

प्लेअर बॉल्स फोर सिक्स ख्रिस गेल (बंगलोर रॉयल चॅलेंजर्स)300811युसुफ पठाण (राजस्थान रॉयल्स)370908ऍडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स)420909सनथ जयसूर्या(मुंबई इंडियन्स)4507 10ख्रिस गेल (बंगलोर रॉयल चॅलेंजर्स) 460909

IPL मधील हायेस्ट स्कोर

प्लेअर रन्स बॉल्स फोरसिक्सख्रिस गेल (बंगलोर)175661317ब्रँडन मॅक्युलम (कोलकाता)158*731013मुरली विजय (चेन्नई) 127560811पॉल वलथाडी (पंजाब) 120*631902वीरेंद्र सेहवाग (दिल्ली) 119561306

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2013 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close