S M L

पोलार्डची कॅच सोडण्यात हॅट्‌ट्रीक

06 मेआयपीएलमध्ये सर्वात चपळ फिल्डर कोण असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येईल आणि ते म्हणजे मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड..पण याच पोलार्डनं काल चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये सलग तीन कॅच सोडत अनोखी हॅट्‌ट्रीक नोंदवली. चेन्नईचा ओपनर माईक हसी बॅटिंगसाठी मैदानात उतरला. आणि मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल जॉन्सच्या बॉलिंगवर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलवर पोलार्डनं हसीला जीवदान दिलं. पॉइंटवर फिल्डिंग करत असलेल्या पोलार्डनं सलग तीन कॅच सोडले. क्रिकेट इतिहासत एकाच फिल्डरनं सलग तीन कॅच सोडण्याची ही पहिली वेळ आहे. विशेष म्हणजे या मॅचमध्ये पोलार्डनं एकूण चार कॅच सोडले. पण याचा जास्त फटका मुंबई इंडियन्सला बसला नाही. कारण हसी स्वस्तात आऊटही झाला. पण पोलार्डनं सुरैश रैना आणि महेंद्र सिंग धोणीची कॅच पकडत याची भरपाईसुद्धा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 12:22 PM IST

पोलार्डची कॅच सोडण्यात हॅट्‌ट्रीक

06 मे

आयपीएलमध्ये सर्वात चपळ फिल्डर कोण असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येईल आणि ते म्हणजे मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड..पण याच पोलार्डनं काल चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये सलग तीन कॅच सोडत अनोखी हॅट्‌ट्रीक नोंदवली.

चेन्नईचा ओपनर माईक हसी बॅटिंगसाठी मैदानात उतरला. आणि मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल जॉन्सच्या बॉलिंगवर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलवर पोलार्डनं हसीला जीवदान दिलं. पॉइंटवर फिल्डिंग करत असलेल्या पोलार्डनं सलग तीन कॅच सोडले. क्रिकेट इतिहासत एकाच फिल्डरनं सलग तीन कॅच सोडण्याची ही पहिली वेळ आहे.

विशेष म्हणजे या मॅचमध्ये पोलार्डनं एकूण चार कॅच सोडले. पण याचा जास्त फटका मुंबई इंडियन्सला बसला नाही. कारण हसी स्वस्तात आऊटही झाला. पण पोलार्डनं सुरैश रैना आणि महेंद्र सिंग धोणीची कॅच पकडत याची भरपाईसुद्धा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2013 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close