S M L

भारताची सेमीफायनलमध्ये धडक

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2013 06:14 PM IST

भारताची सेमीफायनलमध्ये धडक

Dhawan11 जून : रविंद्र जडेजानं घेतलेल्या 5 विकेट आणि शिखर धवनच्या सेंच्युरी जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 8 विकेट राखून पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफीतला भारताचा हा सलग दुसरा विजय ठरलाय. या विजयाबरोबरच भारताने सेमीफानयलमधलं आपलं स्थानही निश्चित केलंय. भारतीय बॉलर्सने केलेल्या दमदार बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणार्‍या विंडिजला 9 विकेट गमावत केवळ 233 रन्स करता आले.

 

ओपनर जॉन्सन चार्ल्सची हाफसेंच्युरी आणि दहाव्या विकेटसाठी डेरेन सॅमीनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर विंडीजला किमान 200 रन्सचा टप्पा पार करता आला. याला उत्तर देताना भारताने सुरुवातच दमदार केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीनं 15 ओव्हर्समध्येच 100 रन्सची पार्टनरशिप केली. रोहित शर्माने शानदार हाफसेंच्युरी ठोकली.

 

तर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनंही रन्सचा दुहेरी आकडा गाठला. पण खरी कमाल केली ती शिखर धवननं..स्पर्धेत सलग दुसरी सेंच्युरी करत शिखर धवननं भारताला दमदार विजय मिळवून दिला. भारतानं विजयाचं आव्हान 10 ओव्हर आणि 8 विकेट राखून पार केलं.

शिखर ध'वन'ची सलग दुसरी सेंच्युरी

भारतीय टीमच्या विजयाचा हिरो ठरला, तो ओपनर शिखर धवन. धवननं स्पर्धेतली सलग दुसरी सेंच्युरी ठोकली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या

शिखर धवननं रोहित शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 100 रन्सची पार्टनरशिप केली. रोहित शर्मा हाफसेंच्युरी करुन आऊट झाला. पण धवन मोठी खेळी करणाच्या निर्धारानंच मैदानात उतरला होता.

 

वेस्टइंडिजच्या बॉलर्सवर वर्चस्व धवननं वर्चस्व गाजवलं. ब्राव्होच्या बॉलिंगवर सिक्स मारत धवननं आपली सेंच्युरी पूर्ण केली. भारतातर्फे अवघी सातवी वनडे खेळणार्‍या धवनची ही दुसरी सेंच्युरी ठरलीय. धवननं 107 बॉलमध्ये तब्बल 10 फोर आणि 1 सिक्स मारत नॉटआऊट सेंच्युरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2013 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close