S M L

इंग्लंडची फायनलमध्ये धडक

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2013 08:20 PM IST

इंग्लंडची फायनलमध्ये धडक

sa vs england20 जून : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत यजमान इंग्लंडनं फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का

बसला आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट राखून धुव्वा उडवला. इंग्लंडच्या भेदक बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणार्‍या दक्षिण आफ्रिकेची टीम अवघ्या 175 रन्सवर ऑलआऊट झाली. आफ्रिकेचे तब्बल 7 बॅट्समन रन्सचा दुहेरी आकडाही गाठू

शकले नाहीत. अपवाद ठरला तो डावखुरा बॅट्समन डेव्हिड मिलरचा.. मिलरनं नॉटआऊट हाफसेंच्युरी ठोकत टीमला किमान पावणेदोनशे रन्सचा टप्पा गाठून दिला. विजयाचं हे आव्हान इंग्लंडनं 3 विकेटच्या मोबदल्यात 38व्या ओव्हर्समध्येच पार केलं. जोनाथन ट्रॉटनं नॉटआऊट 82 रन्स करत विजयावर शिक्कामोर्तब केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2013 08:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close