S M L

वेस्ट इंडिजची भारतावर 1 विकेटनं मात

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2013 08:17 PM IST

वेस्ट इंडिजची भारतावर 1 विकेटनं मात

23456789001 जुलै : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारताच्या विजयाला अखेर ब्रेक लागलाय. वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या ट्राय सीरिजमध्ये वेस्ट इंडिजनं भारतावर 1 विकेटनं मात केली. या सीरिजमधला वेस्ट इंडिजचा हा सलग दुसरा विजय ठरलाय.

दुखापतग्रस्त कॅप्टन ड्वेन ब्राव्होच्याऐवजी टॉससाठी वेस्टइंडिजतर्फे कायरन पोलार्ड मैदानात उतरला. विंडीजनं टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग देण्याचा निर्णय घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफीत यशस्वी ठरलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्मानं भारतीय इनिंगची सुरुवात केली. पण मोठी खेळी साकारण्यात ही जोडी अपयशी ठरली. केमार रोचनं स्वत:च्या बॉलिंगवर धवनचा कॅच घेतला. आणि भारताला पहिला धक्का बसला. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या कोहलीनं सुरुवातच आक्रमक केली. पण कोहलीच्या आक्रमक बॅटिंगला डेरेन सॅमीनं लगाम घातला. स्लिपमध्ये गेलनं कोहलीचा शानदार कॅच घेतला. दुसरीकडे रोहित शर्मानं दिनेश कार्तिकच्या साथीनं स्कोर बोर्ड हलता ठेवला.

ही जोडी मोठा स्कोर उभारणार असं वाटत असतानाच भारताला तिसरा धक्का बसला. कार्तिक 23 रन्स करुन आऊट झाला. रोहित शर्मानं मात्र आपली हाफसेंच्युरी पुर्ण केली. पण यानंतर लगेचच 60 रन्सवर रोहित शर्मा पॅव्हेलिअनमध्ये परतला. सुरेश रैनानं काही शानदार फोर मारत 44 रन्स केले. पण हाफसेंच्युरीच्या आधीच तोही आऊट झाला.धोणी आणि रविंद्र जडेजाही मैदानात फार काळ टीकू शकले नाहीत. टिनो बेस्टनं या दोघांनीही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला.

नवव्या क्रमांकावर आलेल्या भुवनेश्वर कुमारनं शेवटच्या ओव्हरमध्ये 1 सिक्स आणि 1 फोर मारत भारताला 229 रन्सचा टप्पा गाठून दिला. विजयाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजची सुरुवातही खराब झाली. उमेश यादवनं धोकादायक गेलची विकेट घेतली.

तर ड्वेन स्मिथलाही त्यानं शुन्यावर आऊट केलं. भारतीय बॉलर्सचा धडाका सुरुच होता. भुवनेश्‍वर कुमारनं सॅम्युअमला आऊट करत विंडीजला मोठा धक्का दिला. पण यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि ड्वेन ब्राव्होची जोडी जमली आणि या जोडीनं विंडीजला 100 रन्सचा टप्पा पार करुन दिला. आर अश्विननं ही जोडी फोडली. ब्राव्हो 55 रन्स करुन आऊट झाला. तर पोलार्ड आणि रामदीनंही झटपट आऊट झाले. डेरेन सॅमीनं भारतीय बॉलर्सवर हल्लाबोल करत मॅचमध्ये रंगत आणली. पण फटकेबाजीच्या नादात ईशांत शर्माच्या बॉलिंगवर सॅमी आऊट झाला.

जॉन्सन चार्ल्सही 97 रन्सवर आऊट झाला तर रैनानं नरिनची विकेट घेतली आणि भारतानं मॅचमध्ये कमबॅक केलं. पण सलग सातव्या विजयाचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. केमार रोच आणि टिनो बेस्ट या शेवटच्या जोडीनं विजयासाठी आवश्यक असणारे 10 रन्स करत विंडीजला थरारक विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 1, 2013 08:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close