S M L

टीम इंडियाची 'आफ्रिकन सफारी' जाहीर

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2013 07:30 PM IST

टीम इंडियाची 'आफ्रिकन सफारी' जाहीर

08 जुलै : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याचं वेळापत्रक जाहीर झालंय. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात टीम इंडिया दोन टी-20, 7 वन डे मॅचची सीरिज आणि त्यानंतर 3 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत. 21 आणि 24 नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टी 20 मॅच रंगतील.

 

तर 27 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान 7 मॅचची वन डे सीरिज खेळवली जाईल. तर 'बॉक्सिंग डे'ला भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. त्यानंतर 2 जानेवारीला केप टाऊनला दुसरी तर 15 जानेवारीला जोहान्सबर्गला तिसरी टेस्ट खेळवली जाईल.

 

असं आहे वेळापत्रक

21 आणि 24 नोव्हेंबर -दोन टी-20 मॅच

27 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर - 7 वन डे मॅच

26 डिसेंबर ते 15 जानेवारी - 3 टेस्ट मॅच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2013 07:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close