S M L

केकेआरचा प्रदीप सांगवान डोपिंगमध्ये दोषी

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2013 11:27 PM IST

केकेआरचा प्रदीप सांगवान डोपिंगमध्ये दोषी

pradep sangvan18 जुलै : आयपीएलचा सहावा हंगाम संपून आता 3 महिने झाले, पण वाद अजूनही संपलेला नाही. आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स टीमचा खेळाडू प्रदीप सांगवान डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान, खेऴाडूंची डोप टेस्ट घेण्यात आली होती. सांगवान केकेआर टीमच्या प्रमुख बॉलरपैकी एक आहे. प्रदीप सांगवानच्या ए सॅम्पलमध्ये बंदी घातलेल्या उत्तेजक द्रव्याचे अंश आढऴून आले आहेत, असं बीसीसीआयनं म्हटलंय. आता सांगवानचं बी सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आलंय. आणि यात जर तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. डोपिंगसंबंधी बीसीसीआयचे वर्ल्ड ऍण्टी डोपिंग एजन्सीचे नियम मानत नाही, बीसीसीआयचे स्वत:चे यासंबंधी नियम आहेत. आणि यानुसारच सांगवानवर कारवाई होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2013 11:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close