S M L

रसूलची निवड खेळण्यासाठी की खच्चीकरणासाठी -अब्दुल्ला

Sachin Salve | Updated On: Aug 3, 2013 11:02 PM IST

Image omar_abdula4_300x255.jpg03 ऑगस्ट : झिम्बाब्वे दौर्‍यासाठी भारतीय टीममध्ये निवड झालेला जम्मू काश्मिरचा क्रिकेटपटू परवेझ रसूल याला एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी न दिल्यानं जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी बीसीसीआयला लक्ष्य बनवलंय. झिम्बाब्वेविरुद्धच्या आजच्या पाचव्या आणि शेवटच्या मॅचमध्येही रसूलला संधी न दिल्यानं अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केलीय.

 

पाच सामन्यांची ही मालिका भारताने 4-0 अशी जिंकली, आज पाचवी मॅच खेळवली जातेय. या सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली, पण रसूलला बाहेर बसावं लागलं. रसूलनं रणजी क्रिकेट स्पर्धेत ऑलराऊंड कामगिरी करत 594 रन्स आणि 33 बळी मिळवलेत. याच जोरावर त्याची भारतीय टीममध्ये निवड झाली, पण आता त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्यासाठी आणखी वाट पाहवी लागणार आहे.

बीसीसीआयवर टीका

'झिम्बाब्वे दौर्‍यासाठी परवेझ रसूलची निवड, ही त्याला खेळवण्यासाठी की मानसिक खच्चीकरण करण्यासाठी करण्यात आली होती. बीसीसीआयनं त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची एकतरी संधी द्यायला हवी होती.'-ओमार अब्दुल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2013 10:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close