S M L

बीसीसीआय 'क्लीन बोल्ड' चौकशी समिती अवैधच !

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2013 11:09 PM IST

बीसीसीआय 'क्लीन बोल्ड' चौकशी समिती अवैधच !

07 ऑगस्ट : मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती मिळवण्यात बीसीसीआय अपयशी ठरली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं स्थापन केलेली चौकशी समिती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं होतं. त्याविरोधात बीसीसीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. खटल्याचा निकाल लागत नाही तोवर चौकशी समितीचा अहवाल ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयच्या चौकशी समितीने चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पन, राज कुंद्राला क्लीन चीट दिली होती. पण यावर मुंबई हाय कोर्टाने ताशेरे ओढले होते. ही समितीच अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2013 11:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close