S M L

प्रभु देवासोबत धोनीचा 'लुंगी डान्स'

खरंतर हा व्हिडिओ आहे टीव्हीएस कंपनीच्या मागच्या वर्षी आलेल्या एका जाहिरातीमधील. परंतु आता मात्र अचानकच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय.

Sonali Deshpande | Updated On: May 31, 2017 12:43 PM IST

प्रभु देवासोबत धोनीचा 'लुंगी डान्स'

31 मे : महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेटमधील धडाकेबाज कामगिरीचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. पण या क्रिकेटपट्टूमध्ये दडलेला डान्सर तुम्ही कधी पाहिलाय का?  सध्या धोनी आणि प्रभु देवा यांनी केलेल्या डान्सची सगळीकडेच चर्चा होतेय.

या व्हिडिओत धोनी हा प्रभू देवाकडून लुंगी डान्स शिकताना पहायला मिळतोय. क्रिकेटच्या मैदानात शांत दिसणारा धोनी यावेळी मात्र काहीशा विनोदी मूडमध्ये दिसतोय.

खरंतर हा व्हिडिओ आहे टीव्हीएस कंपनीच्या मागच्या वर्षी आलेल्या एका जाहिरातीमधील. परंतु आता मात्र अचानकच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय.

व्हिडिओ जरी जुना असला तरीही तुम्ही धोनीचा हा वेगळा अंदाज नक्कीच एंजॉय कराल, यात शंका नाही.

( सौजन्य - यु ट्युब )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close