S M L

महिला वर्ल्ड कपमध्ये आज भारत ऑस्ट्रेलियामध्ये लढत

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हे दोन मातब्बर संघ आज भिडणार आहेत. या सामन्यात जी टीम जिंकेल ती सेमी फायनलमध्ये धडक मारेल.

Sonali Deshpande | Updated On: Jul 12, 2017 02:37 PM IST

महिला वर्ल्ड कपमध्ये आज भारत ऑस्ट्रेलियामध्ये लढत

12जुलै : सलग 4 सामने जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजयरथ साऊथ आफ्रिकानं रोखला. तसाच ऑस्ट्रेलियाचाही विजयरथ इंग्लंडने रोखला. महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हे दोन मातब्बर संघ आज भिडणार आहेत. या सामन्यात जी टीम जिंकेल ती सेमी फायनलमध्ये धडक मारेल.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील ही निर्णायक मॅच आज  ब्रिस्टॉलमध्ये खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 वाजता चालू होईल. या सामन्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

खरं सांगायचं तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 41सामन्यांपैकी फक्त आठच सामने भारत जिंकलाय. पण भारत ऑस्ट्रेलियात झालेल्या शेवटच्या सामन्यात कॅप्टन मिताली राजने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट राखून दमदार पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close